तेथे त्याने पाहिले तर एका शेतात एक विहीर होती; तिच्या आसपास शेरडामेंढरांचे तीन कळप बसलेले होते; कारण त्या विहिरीतून त्या कळपांना पाणी पाजत असत; त्या विहिरीच्या तोंडावर धोंडा होता तो मोठा होता.
याकोबाने आपला मामा लाबान ह्याची मुलगी राहेल आणि आपला मामा लाबान ह्याची मेंढरे पाहिली तेव्हा त्याने जवळ जाऊन विहिरीच्या तोंडावरचा धोंडा लोटून आपला मामा लाबान ह्याच्या मेंढरांना पाणी पाजले.
लाबानाने आपला भाचा याकोब आल्याचे वर्तमान ऐकले तेव्हा तो धावत त्याला सामोरा गेला. त्याला आलिंगन देऊन त्याने त्याची चुंबने घेतली; त्याने त्याला आपल्या घरी नेले. मग त्याने लाबानाला सर्व वृत्तान्त कथन केला.
लेआ गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, त्याचे नाव तिने ‘रऊबेन’ ठेवले; ती म्हणाली, “परमेश्वराने माझ्या दु:खाकडे पाहिले आहे, कारण आता माझा नवरा माझ्यावर प्रीती करील.”
ती पुन: गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, तेव्हा ती म्हणाली, “मी नावडती आहे हे देवाने ऐकले म्हणून त्याने मला हाही दिला;” आणि तिने त्याचे नाव ‘शिमोन’ ठेवले.
ती पुन: गर्भवती होऊन तिला मुलगा झाला; तेव्हा ती म्हणाली, “मला आता तीन मुलगे झाले, आता तरी माझा नवरा माझ्याशी मिळून राहील;” म्हणून तिने त्याचे नाव ‘लेवी’ ठेवले.