नंतर याकोबाच्या कानावर लाबानाच्या मुलांचे असे म्हणणे आले की, आमच्या बापाचे होते नव्हते ते सर्व याकोबाने लुबाडले आहे, आणि आमच्या बापाच्या सर्वस्वातून त्याने ही सर्व धनदौलत मिळवली आहे.
त्या आल्यावर तो त्यांना म्हणाला, “तुमच्या बापाच्या चर्येवरून मी ताडले की, तो पूर्वीप्रमाणे माझ्यावर प्रसन्न नाही, तथापि माझ्या वाडवडिलांचा देव माझ्याबरोबर आहे.
त्याने जेव्हा म्हटले की, ‘ठिपकेदार शेळ्यामेंढ्या तुला वेतनादाखल मिळतील,’ तेव्हा सर्व कळपांना ठिपकेदार पोरे होऊ लागली; त्याने जेव्हा म्हटले की, ‘बांड्या तुझ्या,’ तेव्हा सर्व कळपांना बांडी पोरे होऊ लागली.
तू चोरून पळालास, मला फसवलेस, काही कळू दिले नाहीस, असे का केलेस? तू मला कळवले असतेस तर मी आनंदाने गाणेबजावणे करून, डफ, चंग वगैरे वाद्ये लावून तुला रवाना केले असते.
आपल्या देवता ज्याच्याजवळ सापडतील तो जिवंत राहायचा नाही; आपण आपल्या भाऊबंदांदेखत माझी झडती घेऊन आपले काही सापडेल तर ओळखून खुशाल घ्या.” कारण राहेलीने देवता चोरून आणल्या होत्या हे याकोबाला माहीत नव्हते.
तेव्हा लाबान याकोबाच्या डेर्यात, लेआच्या डेर्यात आणि त्या दोन दासींच्या डेर्यात गेला, परंतु त्याला काही सापडले नाही. मग तो लेआच्या डेर्यातून राहेलीच्या डेर्यात गेला.
ती बापाला म्हणाली, “स्वामी, मला आपल्यापुढे उठून उभे राहवत नाही म्हणून रागावू नका, कारण मला स्त्रीधर्म प्राप्त झाला आहे.” अशा प्रकारे त्याने शोध केला; पण त्याला त्या गृहदेवता सापडल्या नाहीत.
आपण माझ्या सर्व सामानाची झडती घेतली त्यांत आपल्या घरच्या काही वस्तू सापडल्या काय? सापडल्या असल्यास त्या ह्या माझ्या व आपल्या भाऊबंदांसमोर ठेवा; म्हणजे त्यांना आपल्या दोघांचा निवाडा करता येईल.
गेली वीस वर्षे मी आपल्या घरी काढली; चौदा वर्षे आपल्या दोन्ही मुलींसाठी आणि सहा वर्षे आपल्या शेरडामेंढरांसाठी मी आपली चाकरी केली. आणि दहादा आपण माझ्या वेतनात फेरबदल केला.
माझ्या पित्याचा देव, अब्राहामाचा देव आणि इसहाकाचा ‘धाक’ (देव) माझा पाठीराखा नसता तर आताही आपण मला रिकामे लावून दिले असते. माझे दु:ख व माझ्या हातांनी केलेले कष्ट देवाने पाहून काल रात्री आपल्याला धमकावले.”
ह्यावर लाबान याकोबाला म्हणाला, “ह्या मुली माझ्या मुली आहेत, आणि ही मुले माझी मुले आहेत; हे कळप आणि जे काही तुझ्या दृष्टीसमोर दिसते आहे ते अवघे माझे आहे; आता ह्या माझ्या मुली व त्यांच्या पोटची मुले ह्यांना मी काय करू?