×

पवित्र शास्त्र RV (Re-edited)

उत्पत्ति ३६

1
एसाव म्हणजे अदोम ह्याची वंशावळ:
2
एसावाने कनानी मुलींतून बायका केल्या. एलोन हित्ती ह्याची मुलगी आदा, सिबोन हिव्वी ह्याची नात म्हणजे अनाची मुलगी अहलीबामा,
3
आणि इश्माएलाची मुलगी, नबायोथाची बहीण बासमाथ ह्या बायका त्याने केल्या.
4
एसावापासून आदेला अलीपाज व बासमाथेला रगुवेल हे मुलगे झाले;
5
आणि अहलीबामेस यऊश, यालाम व कोरह हे झाले. हे एसावाचे मुलगे; हे त्याला कनान देशात झाले,
6
मग एसाव आपल्या बायका, मुलगे, मुली, आपल्या घरची सर्व माणसे, आपली गुरेढोरे व इतर जनावरे, आणि कनान देशात मिळवलेले धन हे सर्व घेऊन याकोब राहत होता तेथून दूर देशी निघून गेला.
7
कारण त्याची संपत्ती एवढी वाढली की, त्यांना एकत्र राहण्याची सोयच नव्हती; तसेच त्यांची गुरेढोरे फार वाढल्या-मुळे ज्या देशात ते उपरे होते तेथे तेवढ्यांचा निर्वाह होईना.
8
म्हणून एसाव सेईरच्या डोंगराळ प्रदेशात वस्ती करून राहिला. एसाव हाच अदोम.
9
सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहणार्‍या अदोमी लोकांचा मूळ पुरुष एसाव ह्याची वंशावळ:
10
एसावाच्या मुलांची नावे ही: एसावाची बायको आदा हिचा मुलगा अलीपाज आणि एसावाची बायको बासमाथ हिचा मुलगा रगुवेल.
11
अलीपाज ह्याचे मुलगे तेमान, ओमार, सपो, गाताम आणि कनाज हे होते.
12
एसावाचा मुलगा अलीपाज ह्याची तिम्ना म्हणून एक उपपत्नी होती, तिच्या पोटी त्याला अमालेक झाला. एसावाची बायको आदा हिचा हा वंश.
13
रगुवेलाचे मुलगे नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा हे होते; एसावाची बायको बासमाथ हिचा हा वंश.
14
सिबोनाची मुलगी1 अना, ह्याची कन्या अहलीबामा जी एसावाची बायको तिच्यापासून एसावाला यऊश, यालाम व कोरह हे मुलगे झाले.
15
एसाव वंशांतले सरदार झाले ते हे: एसावाचा पहिला मुलगा अलीपाज; ह्याचे मुलगे सरदार तेमान, सरदार ओमार, सरदार सपो, सरदार कनाज,
16
सरदार कोरह, सरदार गाताम व सरदार अमालेक; अदोम देशात अलीपाज ह्याच्या पोटी हे सरदार झाले. हे आदेचे मुलगे.
17
एसावाचा मुलगा रगुवेल ह्याचे मुलगे हे: सरदार नहाथ, सरदार जेरह, सरदार शाम्मा व सरदार मिज्जा, हे सरदार रगुवेलास अदोम देशात झाले; एसावाची बायको बासमाथ हिचे हे मुलगे.
18
एसावाची बायको अहलीबामा, हिचे मुलगे हे: सरदार यऊश, सरदार यालाम व सरदार कोरह; हे सरदार एसावाची बायको अहलीबामा, अनाची मुलगी, हिला झाले.
19
एसाव म्हणजे अदोम ह्याचा हा वंश, व हे त्यांचे सरदार.
20
सेईर होरी ह्याचे जे मुलगे त्या देशात राहत होते ते हे: लोटान, शोबाल, सिबोन व अना,
21
दिशोन, एसर व दीशान; हे अदोम देशात सेईराचे होरी वंशातील सरदार होत.
22
लोटानाचे मुलगे होरी व हेमाम हे होत; लोटानाची बहीण तिम्ना ही होती.
23
शोबालाचे मुलगे अलवान, मानहाथ, एबाल, शपो व ओनाम हे होते.
24
सिबोनाचे मुलगे अय्या व अना हे होते. आपला बाप सिबोन ह्याची गाढवे राखत असता ज्याला रानात उष्ण पाण्याचे झरे सापडले तोच हा अना.
25
अनाचा मुलगा दिशोन व अनाची मुलगी अहलीबामा.
26
दिशोनाचे मुलगे हेमदान, एश्बान, यित्रान व करान हे होत.
27
एसराचे मुलगे बिल्हान, जावान व अकान हे होत.
28
दिशानाचे मुलगे ऊस व अरान हे होत.
29
होर्‍यांपैकी जे सरदार झाले ते हे: सरदार लोटान, सरदार शोबाल, सरदार सिबोन, सरदार अना,
30
सरदार दिशोन, सरदार एसर, सरदार दीशान; सेईर देशातील होर्‍यांचे सरदार हे होत.
31
इस्राएल लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्यापूर्वी अदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते हे:
32
बौराचा मुलगा बेला ह्याने अदोमात राज्य केले; त्याची राजधानी दिन्हाबा नगर होते.
33
बेला मेल्यावर बस्रा येथला जेरहाचा मुलगा योबाब त्याच्या जागी राजा झाला.
34
योबाब मेल्यावर तेमानी लोकांच्या देशाचा हूशाम त्याच्या जागी राजा झाला.
35
हूशाम मेल्यावर बदाद ह्याचा मुलगा हदाद त्याच्या जागी राजा झाला; ह्यानेच मवाबाच्या मैदानात मिद्यान्यांचा मोड केला; त्याची राजधानी अवीत शहर होते.
36
हदाद मेल्यावर मास्रेका येथील साम्ला त्याच्या जागी राजा झाला.
37
साम्ला मेल्यावर फरात नदीवर असलेल्या रहोबोथ येथला शौल त्याच्या जागी राजा झाला.
38
शौल मेल्यावर अकबोराचा मुलगा बाल-हानान त्याच्या जागी राजा झाला.
39
अकबोराचा मुलगा बाल-हानान हा मेल्यावर हदार त्याच्या जागी राजा झाला; त्याची राजधानी पाऊ होती. त्याच्या बायकोचे नाव महेटाबेल; ही मे-जाहाबाची मुलगी मात्रेद हिची मुलगी होती.
40
एसाव वंशांतील सरदारांची नावे, कुळे व राहण्याच्या ठिकाणांवरून असलेली नावे ही: सरदार तिम्ना, सरदार आल्वा, सरदार यतेथ,
41
सरदार अहलीबामा, सरदार एला, सरदार पीनोन,
42
सरदार कनाज, सरदार तेमान, सरदार मिब्सार,
43
सरदार माग्दीएल व सरदार ईराम; अदोम वंशजांनी जो देश वतन करून घेतला, त्यातल्या त्यांच्या निवासस्थानांप्रमाणे त्यांचे हे सरदार होत. अदोमी लोकांचा मूळ पुरुष एसाव.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide
:
टिपा जतन करा