|
| 1 |
|
| ही आदामाची लिखित वंशावळी आहे. जेव्हा परमेश्वराने मानवजातीला निर्माण केले, त्यांनी त्याला आपल्या प्रतिरूपात घडविले. |
|
| 2 |
|
| परमेश्वराने त्यांना पुरुष व स्त्री असे निर्माण केले. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना “मानवजात” असे नाव दिले. |
|
| 3 |
|
| आदाम 130 वर्षाचा झाला तेव्हा त्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपात, त्याच्या स्वतःच्या प्रतिमेत एक मुलगा झाला; त्याने त्याचे नाव शेथ ठेवले. |
|
| 4 |
|
| शेथच्या जन्मानंतर आदाम आणखी आठशे वर्षे जगला. याकाळात त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. |
|
| 5 |
|
| आदाम एकंदर 930 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. |
|
| 6 |
|
| शेथ 105 वर्षाचा झाला, तेव्हा त्याला अनोश झाला. |
|
| 7 |
|
| अनोशचा पिता झाल्यावर शेथ 807 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. |
|
| 8 |
|
| शेथ एकंदर 912 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. |
|
| 9 |
|
| अनोश नव्वद वर्षाचा झाला तेव्हा त्याला केनान झाला. |
|
| 10 |
|
| केनानचा पिता झाल्यावर अनोश 815 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. |
|
| 11 |
|
| अनोश एकंदर 905 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. |
|
| 12 |
|
| केनान सत्तर वर्षाचा झाला तेव्हा तो महलालेलाचा पिता झाला. |
|
| 13 |
|
| महलालेलाचा पिता झाल्यावर केनान 840 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. |
|
| 14 |
|
| केनान एकंदर 910 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. |
|
| 15 |
|
| महलालेल 65 वर्षाचा झाला तेव्हा तो यारेदाचा पिता झाला. |
|
| 16 |
|
| यारेदाचा पिता झाल्यावर महलालेल 830 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. |
|
| 17 |
|
| महलालेल एकंदर 895 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. |
|
| 18 |
|
| यारेद 162 वर्षाचा झाला तेव्हा तो हनोखाचा पिता झाला. |
|
| 19 |
|
| हनोखाचा पिता झाल्यावर यारेद 800 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. |
|
| 20 |
|
| यारेद एकंदर 962 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. |
|
| 21 |
|
| हनोख 65 वर्षाचा झाला तेव्हा तो मथुशेलहाचा पिता झाला. |
|
| 22 |
|
| मथुशेलहाचा पिता झाल्यावर हनोख परमेश्वरासोबत विश्वासूपणे 300 वर्षे चालला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. |
|
| 23 |
|
| हनोख एकंदर 365 वर्षे जगला. |
|
| 24 |
|
| हनोख परमेश्वरासोबत विश्वासूपणे चालत असताना तो अदृश्य झाला, कारण परमेश्वराने त्याला नेले. |
|
| 25 |
|
| मथुशेलह 187 वर्षाचा झाला तेव्हा तो लामेखाचा पिता झाला. |
|
| 26 |
|
| लामेखाचा पिता झाल्यानंतर मथुशेलह 782 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. |
|
| 27 |
|
| मथुशेलह एकंदर 969 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. |
|
| 28 |
|
| लामेख 182 वर्षांचा झाल्यावर त्याला पुत्र झाला. |
|
| 29 |
|
| त्याने त्याचे नाव नोआह असे ठेवले, कारण तो म्हणाला, “शाप दिलेली भूमी कसण्याच्या अवघड कामापासून याहवेह आम्हाला विसावा देतील.” |
|
| 30 |
|
| नोआहच्या जन्मानंतर लामेख 595 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. |
|
| 31 |
|
| लामेख एकंदर 777 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. |
|
| 32 |
|
| नोआह 500 वर्षाचा झाला तेव्हा तो शेम, हाम व याफेथ यांचा पिता झाला. |
|
|
|
|