इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यापासून चारशे ऐंशीव्या वर्षी, इस्राएलावरील शलमोनाच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, दुसर्या म्हणजे जिव नावाच्या महिन्यात शलमोनाने परमेश्वराचे मंदिर बांधण्यास सुरुवात केली.
आणखी मंदिराच्या भिंतींना लागून सभोवार मजले केले; आणि तसेच मंदिराचे पवित्रस्थान आणि परमपवित्रस्थान ह्यांच्या भिंतींना लागून सभोवार मजले केले; आणि मंदिराच्या सभोवार कोठड्या केल्या;
सर्वांत खालच्या मजल्याची रुंदी पाच हात, मधल्या मजल्याची सहा हात व वरच्या मजल्याची सात हात होती; त्याने मंदिराच्या आसपासच्या भिंतींना बाहेरून तोडे ठेवले होते, ते अशासाठी की मंदिराच्या भिंतींत तुळया शिरू नयेत.
“तू हे मंदिर बांधत आहेस, त्या अर्थी तू माझ्या नियमांप्रमाणे चाललास, माझे निर्णय पाळलेस व माझ्या सर्व आज्ञा मानून त्याप्रमाणे वागलास तर मी जे वचन तुझा बाप दावीद ह्याला दिले ते तुझ्याशी कायम करीन.
त्याने त्या मंदिराच्या भिंतींना आतल्या बाजूने गंधसरूंच्या तक्त्यांची मढवणी केली; जमिनीपासून कडीपाटापर्यंत आतून आणि मंदिराच्या जमिनीला त्याने देवदारूची तक्तपोशी केली.
मंदिराच्या मागल्या भागी जमिनीपासून कडीपाटापर्यंत वीस हात गंधसरूच्या तक्त्यांची मढवणी केली; ह्या प्रकारे त्याने परमपवित्रस्थानासाठी मंदिराला एक गाभारा तयार केला.
आतल्या भागी मंदिराच्या भिंती गंधसरूच्या तक्त्यांनी मढवल्या असून त्यांवर इंद्रावणे (रानकाकड्या) व फुललेली फुले कोरली होती; चोहीकडे गंधसरूच होता, दगड असा मुळीच दृष्टीला पडत नसे.
आतल्या गाभार्यात त्याने ते करूब ठेवले; करूबांचे पंख असे पसरले होते की एका करूबाचा एक पंख एका बाजूच्या भिंतीला व दुसर्या करूबाचा एक पंख दुसर्या बाजूच्या भिंतीला लागलेला होता; त्याचे दुसरे दोन पंख गाभार्याच्या मधोमध एकमेकांना लागलेले होते.
ती दोन्ही दारे जैतून लाकडाची असून त्याने त्यांवर करूब, खजुरीची झाडे व फुललेली फुले कोरली असून ती सोन्याने मढवली होती; करूबांवर व खजुरीच्या झाडांवरही सोने लावले होते.
आणि अकराव्या वर्षी बूल महिन्यात म्हणजे आठव्या महिन्यात मंदिर आतल्या एकंदर उपकरणसाहित्यासहित नमुन्याप्रमाणे पुरे झाले. ह्याप्रमाणे ते मंदिर बांधण्यासाठी शलमोनाला सात वर्षे लागली.