“आपल्या बापाने आमच्यावर जू ठेवले होते ते भारी होते; तर आता आपल्या बापाने आमच्यावर लादलेले कठीण दास्य व भारी जू हलके करा म्हणजे आम्ही आपले ताबेदार होऊ.”
रहबाम राजाने आपला बाप शलमोन जिवंत असता जी वृद्ध माणसे त्याच्या पदरी होती त्यांचा सल्ला घेतला; तो म्हणाला, “ह्या लोकांना उत्तर देण्याच्या बाबतीत तुम्ही मला काय मसलत देता?”
त्याच्याबरोबर लहानाचे मोठे झालेल्या त्या तरुण पुरुषांनी त्याला उत्तर दिले, “हे लोक आपणाला म्हणतात की, ‘आपल्या बापाने आमच्यावर भारी जू लादले होते तर आता आपण ते हलके करा,’ तर त्यांना असे सांगा की माझी करांगुली माझ्या बापाच्या कंबरेपेक्षा मोठी आहे.
त्या तरुण पुरुषांच्या सल्ल्याप्रमाणे तो त्यांना म्हणाला, “माझ्या बापाने तुमच्यावर भारी जू लादले होते, पण मी ते अधिक भारी करणार; माझा बाप तुम्हांला आसुडांनी ताडन करीत असे, मी तुम्हांला विंचवांनी ताडन करीन.”
अशा प्रकारे राजाने लोकांचे ऐकले नाही; ह्याचे कारण हेच की जे वचन परमेश्वराने शिलोकर अहीया ह्याच्या द्वारे नबाटाचा पुत्र यराबाम ह्याला दिले होते ते पूर्ण व्हावे अशी देवाची योजना होती.
राजा ऐकत नाही हे पाहून सगळ्या इस्राएल लोकांनी त्याला म्हटले, “दाविदाचे आम्ही काय लागतो? इशायाचा पुत्र आमचा वतनभाग नाही, हे इस्राएला, आपल्या डेर्यांकडे चालता हो; दाविदा, आता तू आपले घर सांभाळ.” मग सर्व इस्राएल लोक आपापल्या डेर्याकडे चालते झाले.
रहबाम राजाने वेठीस लावलेल्या लोकांची देखरेख करणारा हदोराम ह्याला पाठवले; त्याला इस्राएल लोकांनी दगडमार करून ठार केले. इकडे रहबाम राजा त्वरेने आपल्या रथात बसून यरुशलेमेस पळून गेला. ह्या प्रकारे इस्राएल लोकांनी दाविदाच्या घराण्याशी फितुरी केली ती आजवर चालू आहे.