काही वर्षे लोटल्यावर तो शोमरोन येथे अहाबाच्या भेटीस गेला. त्या प्रसंगी अहाबाने त्याच्यासाठी व त्याच्याबरोबरच्या लोकांसाठी पुष्कळ मेंढरे व बैल कापले आणि आपल्याबरोबर रामोथ-गिलादावर चढाई करण्यास त्याने त्याला प्रवृत्त केले.
यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याला इस्राएलाचा राजा अहाब म्हणाला, “रामोथ-गिलाद येथे लढायला आपण माझ्याबरोबर याल काय?” त्याला यहोशाफाटाने उत्तर दिले, “मी आणि आपण एकच; माझे लोक ते आपले लोक; आम्ही आपल्याबरोबर लढाईस येऊ.”
इस्राएलाच्या राजाने सुमारे चारशे संदेष्टे जमवून त्यांना विचारले, “आम्ही रामोथ-गिलादावर चढाई करून जावे की न जावे?” त्यांनी उत्तर दिले, “चढाई करून जावे; देव ते राजाच्या हाती देईल.”
इस्राएलाचा राजा यहोशाफाटास म्हणाला, “ज्याच्या द्वारे परमेश्वराचा सल्ला घेता येईल असा आणखी एक मनुष्य आहे, पण मला त्याचा तिरस्कार वाटतो; कारण मला अनुकूल असा संदेश तो कधीही देत नाही, प्रतिकूल तेवढाच देतो; तो इम्लाचा पुत्र मीखाया होय.” यहोशाफाट म्हणाला, “राजाने असे बोलू नये.”
इस्राएलाचा राजा आणि यहूदाचा राजा यहोशाफाट हे आपापली राजवस्त्रे धारण करून शोमरोनाच्या वेशीजवळ एका उघड्या जागेत आपापल्या सिंहासनावर विराजमान झाले होते, आणि सर्व संदेष्टे त्यांच्यापुढे भाषण करीत होते.
तेव्हा कनानाचा पुत्र सिद्कीया ह्याने लोखंडाची शिंगे करून आणली होती; तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘ह्या शिंगांनी तू अरामी लोकांना हुंदडून त्यांचा नाश करशील.”’
जो जासूद मीखायाला बोलावण्यास गेला होता तो त्याला म्हणाला, “पाहा, सर्व संदेष्टे एका विचाराचे होऊन राजासंबंधाने शुभवचन बोलत आहेत, म्हणून त्यांच्याप्रमाणेच तूही शुभसंदेश कथन करावास.”
तो राजाकडे आला तेव्हा राजाने त्याला विचारले, “हे मीखाया, आम्ही रामोथ-गिलादाशी युद्ध करायला जावे की न जावे?” त्याने त्याला म्हटले, “जा, यशस्वी हो; ते तुमच्या हाती लागतील.”
मग तो म्हणाला, “सर्व इस्राएल मेंढपाळावाचून मेंढरांसारखे डोंगरावर विखुरले आहेत असे मला दिसले. तेव्हा परमेश्वर म्हणाला, ‘ह्यांना कोणी धनी नाही, तर हे आपापल्या घरी सुखरूप परत जावोत.”’
मीखाया म्हणाला, “तर आता तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका; परमेश्वर आपल्या सिंहासनावर विराजमान झाला आहे व त्याच्या उजवीकडे स्वर्गातील सर्व सेना उभी आहे असे माझ्या दृष्टीस पडले.
परमेश्वराने विचारले, ‘कसा?’ तो म्हणाला, ‘मी जाऊन त्याच्या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात असत्य वदवणारा आत्मा होईन.’ परमेश्वर म्हणाला, ‘तू त्याला मोह घालशील, जा तुझ्याकडून हे होईल; तसेच कर,’
तेव्हा कनानाचा पुत्र सिद्कीया मीखायाजवळ गेला आणि त्याच्या तोंडात मारून त्याने त्याला विचारले, “परमेश्वराचा आत्मा मला सोडून तुझ्याशी बोलण्यास कोठून गेला?”
रथांवरील त्या सरदारांनी यहोशाफाटास पाहिले तेव्हा त्यांना वाटले की हाच इस्राएलाचा राजा असावा; म्हणून त्यांनी त्याच्याशी लढण्यासाठी मोर्चा फिरवला; पण यहोशाफाटाने आरोळी ठोकली तेव्हा परमेश्वराने त्याला साहाय्य केले. देवाने त्यांना त्याच्याकडून निघून जाण्यास प्रवृत्त केले.
मग कोणीएकाने सहजगत्या एक बाण सोडला, तो जाऊन इस्राएली राजाच्या चिलखताच्या सांध्यात रुतला; तेव्हा तो आपल्या सारथ्यास म्हणाला, “मी घायाळ झालो आहे, रथ फिरवून मला सैन्याबाहेर घेऊन जा.”