त्यांच्या बापाने त्यांना सोने, रुपे व अमूल्य वस्तू ह्यांच्या मोठ्या देणग्या दिल्या आणि यहूदातील तटबंदीची नगरे दिली; पण यहोरामास त्याने राज्य दिले, कारण तोच ज्येष्ठ पुत्र होता.
अहाबाच्या घराण्याप्रमाणे, इस्राएलाच्या राजांच्या रीतीप्रमाणे तो चालला; त्याने अहाबाच्या कन्येशी लग्न केले; परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले.
तथापि जो करार परमेश्वराने दाविदाशी केला होता त्यामुळे आणि त्याने त्याचा व त्याच्या वंशजांचा दीप सर्वकाळ राहील असे वचन दिले होते त्यामुळे तो दाविदाचे घराणे नाहीसे करीना.
तेव्हा यहोराम आपले सेनानायक व आपले सर्व रथ बरोबर घेऊन तिकडे गेला. ज्या अदोमी लोकांनी त्याला घेरले होते त्यांना व रथांच्या नायकांना त्याने रात्रीच्या वेळी उठून मार दिला.
अदोमाने यहूदाचे स्वामीत्व झुगारून दिले; ते आजवर तसेच आहे. ह्याच सुमारास लिब्नाने त्याचे स्वामित्व झुगारून दिले; त्याने आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याला सोडले होते म्हणून असे झाले.
एलीया संदेष्ट्याकडून त्याला एक लेख आला तो असा: “तुझा पूर्वज दावीद ह्याचा देव परमेश्वर म्हणतो, ‘तू आपला बाप यहोशाफाट ह्याच्याप्रमाणे व यहूदाचा राजा आसा ह्याच्याप्रमाणे चालला नाहीस;
तर इस्राएलाच्या राजाप्रमाणे चाललास आणि अहाबाच्या घराण्याप्रमाणे यहूदी व यरुशलेमनिवासी ह्यांना व्यभिचारी मतीने चालायला लावले, त्याचप्रमाणे तुझ्याहून चांगले असे जे तुझ्या बापाच्या घराण्यातील तुझे भाऊबंद त्यांचा तू वध केलास;
ते यहूदावर स्वारी करून त्यात घुसले आणि राजमंदिरात जितकी संपत्ती मिळाली तितकी सर्व आणि राजपुत्र व राजस्त्रिया ही अवघी त्यांनी नेली; त्याचा कनिष्ठ पुत्र यहोआहाज1 ह्याच्याखेरीज त्याच्याजवळ कोणी पुत्र राहिला नाही.
उत्तरोत्तर त्या रोगामुळे त्याची आतडी गळत गेली आणि तो अत्यंत पीडा भोगून दोन वर्षांच्या अंती मरण पावला. त्याच्या वाडवडिलांसाठी लोकांनी जशी धूपद्रव्ये जाळली होती तशी त्याच्यासाठी मुळीच जाळली नाहीत.
तो राज्य करू लागला तेव्हा बत्तीस वर्षांचा होता; त्याने आठ वर्षे यरुशलेमेत राज्य केले; तो सर्वांना अप्रिय होऊन मरण पावला; त्याला दावीदपुरात मूठमाती दिली, पण ती राजांच्या थडग्यांत दिली नाही.