बालाथ नगर, शलमोनाची सर्व भांडारनगरे आणि त्याचे रथ व स्वार ठेवण्याची नगरे ह्या सर्वांची मजबुती केली; त्याप्रमाणेच यरुशलेमेत, लबानोनात व आपल्या राज्याच्या सर्व प्रदेशात जे काही शलमोनाला बांधकाम करावेसे वाटले ते सर्व त्याने केले.
त्यांचे काही वंशज त्यांच्या पश्चात देशात राहून गेले होते व त्यांना इस्राएल लोकांच्याने अगदी नष्ट करवले नव्हते; अशांवर शलमोनाने वेठबिगार बसवली; आजपर्यंत तसेच चालले आहे.
मग शलमोनाने जे मंदिर फारोच्या कन्येसाठी बांधले होते त्यात तिला दावीदपुराहून आणले; तो म्हणाला, “ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराचा कोश आला आहे ती ती स्थाने पवित्र होत; म्हणून माझी पत्नी इस्राएलाचा राजा दावीद ह्याच्या मंदिरात राहता कामा नये.”
मोशेच्या आज्ञेस अनुसरून नित्यविधीप्रमाणे शब्बाथवारी, चंद्रदर्शनी आणि बेखमीर भाकरीचा सण, सप्तकांचा सण व मांडवांचा सण ह्या तीन नेमलेल्या वार्षिक सणांत तो होमबली अर्पण करीत असे.
त्याने आपला बाप दावीद ह्याच्या नियमानुसार याजकांच्या सेवेचे वर्ग नेमले आणि स्तुती करण्यास व याजकांच्या देखरेखीखाली सेवाचाकरी करण्यास त्याने लेव्यांनाही प्रत्येक दिवसाच्या विधीप्रमाणे त्यांच्या-त्यांच्या कामांवर नेमले; प्रत्येक द्वाराजवळ द्वारपाळांच्या पाळ्या ठरवल्या; कारण देवाचा माणूस दावीद ह्याने अशीच आज्ञा केली होती.
हूरामाने त्याच्याकडे आपल्या सेवकांच्या हाती गलबते व दर्यावर्दी लोक पाठवले; त्यांनी शलमोनाच्या कामदारांबरोबर ओफिरास जाऊन चारशे पन्नास किक्कार सोने शलमोनाला आणून दिले.