अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीत पुढील वृत्त घडले; त्याचे साम्राज्य हिंदुस्तानापासून कूशापर्यंत होते; ज्याचा अंमल एकशे सत्तावीस प्रांतांवर होता तोच हा अहश्वेरोश.
आपल्या कारकिर्दीच्या तिसर्या वर्षी आपले सर्व सरदार व सेवक ह्यांना मेजवानी दिली; पारस व मेदय ह्यांचे सेनापती, प्रांतोप्रांतीचे महाजन व सरदार त्याच्यापुढे हजर झाले;
तेथील पडदे पांढर्या, हिरव्या, व निळ्या रंगाचे होते; हे पडदे तलम सणाच्या व जांभळ्या रंगाच्या दोर्यांनी चांदीच्या कड्यांमध्ये अडकवून संगमरवरी खांबांना लावले होते; तेथील मंचक सोन्यारुप्याचे असून तांबड्या, पांढर्या, पिवळ्या व काळ्या संगमरवरी पाषाणांच्या फरशीवर ठेवले होते.
हे पिणे नियमानुसार असे; कोणी कोणाला आग्रह करीत नसे; राजाने आपल्या मंदिराच्या सर्व कारभार्यांना आज्ञा केली होती की त्यांनी पाहुण्यांची तब्येत सांभाळावी.
सातव्या दिवशी द्राक्षारसाने राजाचे मन उल्लासयुक्त झाले असता त्याने महूमान, बिगथा, हरबोना, बिग्था, अवगथा, जेरथ, कर्खस असे जे सात खोजे त्याच्या तैनातीस असत त्यांना आज्ञा केली की,
त्याच्याजवळ कर्शना, शेथार, अदमाथा, तार्शीश, मेरेस, मर्सना व ममुखान हे पारस व मेदय येथले सात सरदार असत. ते राजाच्या हुजुरास असून राज्यात त्यांचा पहिला मान असे;)
तेव्हा ममुखानाने राजाला व सरदारांना उत्तर केले, “वश्ती राणीने हा अपमान केवळ राजाचा केला आहे असे नाही, तर सर्व सरदारांचा व अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतांत राहणार्या एकंदर लोकांचाही केला आहे.
राणीच्या ह्या कृत्याची खबर सर्व स्त्रियांना लागेल आणि राजा अहश्वेरोश ह्याने वश्ती राणीला आपल्यासमोर येण्याची आज्ञा केली असूनही ती आली नाही, असे त्यांना कळेल तेव्हा त्या आपापल्या पतींना तुच्छ मानू लागतील.
आज राणीचे हे कृत्य पारस व मेदय ह्यांच्या ज्या सरदारांच्या स्त्रियांनी ऐकले आहे त्या राजाच्या सरदारांना असेच म्हणू लागतील; तशाने फार अपमान व संताप उत्पन्न होईल.
राजाची मर्जी असल्याने त्याने एक राजकीय फर्मान फिरवावे आणि काही फेरबदल होऊ नये म्हणून पारसी व मेदय ह्यांच्या कायद्यांत असे लिहून ठेवावे की वश्तीने राजा अहश्वेरोश ह्याच्यासमोर पुन्हा येऊ नये आणि तिच्याहून कोणी चांगली असेल तिला पट्टराणीचे पद मिळावे.
त्याने आपल्या राज्यातील सर्व प्रांतांतून त्या त्या प्रांताच्या लिप्यांत व त्या-त्या राष्ट्राच्या भाषेत पत्रे पाठवली की प्रत्येक मनुष्याने आपल्या घरात सत्ता चालवावी आणि ही आज्ञा आपल्या लोकांच्या भाषेत प्रसिद्ध करावी.