|
| 1 |
|
| “माझ्या आत्म्याला जीविताचा कंटाळा आला आहे; मी आपले गार्हाणे एकसारखे चालू ठेवीन; माझ्या जिवाला क्लेश होत आहे म्हणून मी बोलेन. |
|
| 2 |
|
| मी देवाला म्हणेन, मला दोषी लेखू नकोस; तू माझ्याशी विरोध का करतोस हे मला सांग. |
|
| 3 |
|
| तू मला छळतोस; आपल्या हातच्या घडलेल्या वस्तूस तुच्छ लेखून दुष्टांच्या मसलतीला प्रसन्न होतोस, हे तुला उचित वाटते काय? |
|
| 4 |
|
| तुला चर्मचक्षू आहेत काय? तुझी दृष्टी मर्त्य मानवाच्या दृष्टीसारखी आहे काय? |
|
| 5 |
|
| तुझे दिवस मर्त्य मानवाच्या दिवसासारखे, तुझी वर्षे मनुष्याच्या वर्षांसारखी आहेत; |
|
| 6 |
|
| म्हणून तू माझा अधर्म शोधतोस व माझे पाप हुडकतोस काय? |
|
| 7 |
|
| तुला तर ठाऊक आहेच, की मी दुष्ट नाही. तुझ्या हातून सोडवणारा कोणी नाही. |
|
| 8 |
|
| तुझ्या हातांनी मला घडवले आहे, त्यांनी सर्वतोपरी मला बनवले आहे, तरी तू माझा नाश करीत आहेस. |
|
| 9 |
|
| तू मला मातीच्या घड्याप्रमाणे घडवले आहेस हे मनात आण; तर पुन्हा मला मातीस मिळवू पाहतोस काय? |
|
| 10 |
|
| तू मला दुधासारखे ओतून दह्यासारखे विरजवले नाहीस काय? |
|
| 11 |
|
| त्वचा व मांस ह्यांचे पांघरूण तू मला घातलेस, अस्थी व स्नायू जोडून मला बनवलेस. |
|
| 12 |
|
| तू मला जीवन दिलेस व माझ्यावर प्रसाद केलास, तुझ्या निगेने माझा प्राण सुरक्षित राहिला. |
|
| 13 |
|
| तरी तू आपला हा उद्देश मनात लपवून ठेवलास; तुझ्या मनात काय होते ते आता मला समजले; |
|
| 14 |
|
| मी पाप केले तर ते ध्यानात ठेवून माझ्या अधर्माची तू मला माफी करणार नाहीस; |
|
| 15 |
|
| मी दुष्ट झालो तर हायहाय करावी लागेल. मी नीतिमान झालो तरी लज्जेने व्याप्त होऊन व माझी विपत्ती पाहून मी आपले डोके वर करणार नाही. |
|
| 16 |
|
| माझे डोके वर झाले की तू सिंहासारखा माझ्या पाठीस लागणार; तुझ्या अद्भुत शक्तीचा माझ्यावर पुन्हा पुन्हा प्रयोग करणार. |
|
| 17 |
|
| तू माझ्याविरुद्ध आपले नवेनवे साक्षीदार आणणार; तू माझ्यावरचा आपला क्रोध वृद्धिंगत करणार; तू माझ्यावर सैन्यामागून सैन्य पाठवणार. |
|
| 18 |
|
| तू मला मातेच्या उदरातून का बाहेर आणलेस? बाहेर आणले नसते तर मी प्राणास अंतरलो असतो, कोणाच्या दृष्टीस मी पडलो नसतो. |
|
| 19 |
|
| मी जन्माला येऊन न आल्यासारखा झालो असतो; मी गर्भावस्थेतूनच कबरेत गेलो असतो; |
|
| 20 |
|
| माझे दिवस थोडे नाहीत काय? तर मला सोड, माझ्यावरची आपली दृष्टी काढ. म्हणजे माझ्या मनाला थोडे चैन पडेल; |
|
| 21 |
|
| मग जेथून परत येणे नाही अशा अंधाराच्या, मृत्यूच्या प्रदेशात मी जाईन; |
|
| 22 |
|
| जेथे काळोख, निबिड अंधकार आहे, अशा मृत्युच्छायेच्या अस्ताव्यस्त प्रदेशात मी जाईन; तेथला प्रकाश अंधकारच होय.” |
|
|
|
|