|
| 1 |
|
| तेव्हा सोफर नामाथीने उत्तर दिले: |
|
| 2 |
|
| “हे सर्व शब्द निरुत्तरीत राहतील काय? हा बडबडा मनुष्य न्यायी ठरेल काय? |
|
| 3 |
|
| तुझ्या व्यर्थ गोष्टींनी लोक शांत होतील काय? तू उपहास करीत असताना, कोणी तुझा निषेध करणार नाही का? |
|
| 4 |
|
| तू परमेश्वराला म्हणतोस, ‘माझा विश्वास अचूक आहे आणि मी तुमच्या दृष्टीने शुद्ध आहे.’ |
|
| 5 |
|
| अहा, मला किती वाटते की परमेश्वराने बोलावे, आणि त्यांनी तुझ्याविरुद्ध आपले तोंड उघडावे |
|
| 6 |
|
| आणि ज्ञानाचे रहस्य तुला प्रकट करावे, कारण खर्या ज्ञानाला दोन बाजू आहेत. हे माहीत असू दे: की परमेश्वराने तुझी काही पापे सोडली आहेत. |
|
| 7 |
|
| “परमेश्वराच्या रहस्याचा तुला थांग लागेल काय? सर्वसमर्थाच्या मर्यादेचे तुला आकलन होईल का? |
|
| 8 |
|
| ती आकाशाहून उंच आहे; मग तू काय करशील? ती अधोलोकाहून खोल आहे; तुला ते काय कळणार? |
|
| 9 |
|
| त्यांचा विस्तार पृथ्वीपेक्षा रुंद, आणि सागराहून ती अधिक विस्तृत आहे. |
|
| 10 |
|
| “जर त्यांनी येऊन तुला बंदिवान केले व न्यायसभा बोलावली, तर त्यांना कोण प्रतिबंध करू शकेल? |
|
| 11 |
|
| खरोखर ते फसविणार्यास ओळखतात; आणि जेव्हा ते दुष्टता पाहतात, तेव्हा ते दखल घेणार नाही का? |
|
| 12 |
|
| जसे रानगाढवाचे शिंगरू मनुष्याचा जन्म घेऊ शकत नाही तसेच अक्कलशून्य मनुष्य शहाणा होणार नाही. |
|
| 13 |
|
| “जर तू आपले हृदय परमेश्वराकडे लावशील आणि त्यांच्याकडे आपले हात पसरशील, |
|
| 14 |
|
| तुझ्या हाती असलेली पापे तू जर दूर करशील आणि आपल्या डेर्यात अन्याय राहू देणार नाहीस, |
|
| 15 |
|
| तर दोषमुक्त असा, तू तुझे मुख वर करशील; तू स्थिर आणि निर्भय असा उभा राहशील. |
|
| 16 |
|
| तुला खरोखर तुझ्या क्लेशांचा विसर पडेल, केवळ वाहून गेलेल्या पाण्यासारखे ते तुला आठवतील. |
|
| 17 |
|
| तुझे जीवन मध्यानाच्या प्रकाशापेक्षा तेजस्वी होईल, आणि अंधकार पहाटेसारखा होईल. |
|
| 18 |
|
| आशा प्राप्त झाल्याने तू निर्भय होशील; तू तुझ्या सभोवती निरखून पाहशील आणि सुरक्षितेत विश्रांती घेशील. |
|
| 19 |
|
| तू निर्भयपणे झोपशील, कोणी तुला घाबरवून टाकणार नाही, आणि अनेकजण तुझ्या समर्थनाची अपेक्षा करतील. |
|
| 20 |
|
| परंतु दुष्टांची नजर अंधुक होईल, आणि निसटून जाण्याचा मार्ग त्यांना आढळणार नाही; मृत्यूची धाप हीच त्यांची आशा असेल.” |
|
|
|
|