|
| 1 |
|
| “पाहा, हे सर्व माझ्या डोळ्यांनी पाहिलेच आहे, माझे कान हे ऐकून समजलेच आहेत. |
|
| 2 |
|
| तुम्हांला कळते ते मलाही कळते; मी काही तुमच्याहून कमी नाही. |
|
| 3 |
|
| खचीत मी सर्वसमर्थाशी बोलणार; मी देवापुढे वाद चालवू इच्छितो. |
|
| 4 |
|
| तुम्ही तर लबाड्या प्रवृत्त करणारे आहात. तुम्ही सर्व कवडीमोल वैद्य आहात. |
|
| 5 |
|
| अहो! तुम्ही अगदी गप्प राहाल तर बरे; ह्यात तुमचा शहाणपणा दिसेल. |
|
| 6 |
|
| आता माझे म्हणणे ऐकून घ्या; माझ्या तोंडच्या प्रतिवादाकडे कान द्या. |
|
| 7 |
|
| काय? तुम्ही देवाच्या पक्षाने विपरीत भाषण करता? त्याच्या पक्षाने कपटभाषण करता? |
|
| 8 |
|
| तुम्ही त्याचे पक्षपाती होणार काय? देवाची वकिली करणार काय? |
|
| 9 |
|
| तुमची त्याने पारख केली तर ते तुम्हांला बरे वाटेल काय? मनुष्य मनुष्याला फसवतो तसे तुम्ही त्याला फसवाल काय? |
|
| 10 |
|
| तुम्ही कपटाने पक्षपात कराल तर तो खातरीने तुमचे करणे उघडकीस आणील. |
|
| 11 |
|
| त्याच्या माहात्म्याने तुम्ही घाबरे होणार नाही काय? त्याचा धाक तुम्हांला वाटणार नाही काय? |
|
| 12 |
|
| ही कर्णोपकर्णी आलेली तुमची वचने केवळ राखेच्या म्हणी होत; तुमचे कोट केवळ मातीचे होत. |
|
| 13 |
|
| गप्प राहा, माझ्याआड येऊ नका म्हणजे मी बोलेन; मग काय होईल ते होवो. |
|
| 14 |
|
| मी आपले मांस दाती का धरावे? मी आपला प्राण मुठीत का धरावा? |
|
| 15 |
|
| तो मला ठार मारणार; तरी मी त्याची आस धरीन;1 तरी माझ्या वर्तनक्रमाचे त्याच्यासमोर मी समर्थन करीन. |
|
| 16 |
|
| ह्यातच माझे तारण होईल; कारण भक्तिहीन त्याच्यासमोर येणार नाही. |
|
| 17 |
|
| अहो, चित्त देऊन माझे भाषण ऐका; माझे म्हणणे तुमच्या कानी पडू द्या. |
|
| 18 |
|
| आता पाहा, मी आपल्या दाव्याची पुरी तयारी केली आहे; मी निर्दोष ठरेन हे मला माहीत आहे. |
|
| 19 |
|
| माझा कोण प्रतिवादी होईल? कोणी झाला तर मी गप्प राहून प्राण सोडीन. |
|
| 20 |
|
| दोनच गोष्टी मात्र करू नकोस, म्हणजे मग मी तुझ्यापासून तोंड लपवणार नाही. माझ्यावरला आपला हात काढ, |
|
| 21 |
|
| आणि मला धाक घालून घाबरे करू नकोस. |
|
| 22 |
|
| मला बोलाव, म्हणजे मी बोलेन, नाहीतर मी बोलतो आणि मग तू त्याचे उत्तर दे. |
|
| 23 |
|
| माझी अधर्मकृत्ये व माझी पातके किती आहेत! माझा अपराध व माझे पाप मला दाखवून दे. |
|
| 24 |
|
| तू आपले तोंड का लपवतोस? मला आपला वैरी का लेखतोस? |
|
| 25 |
|
| इकडून तिकडे उडणार्या पानांचा तू पिच्छा पुरवतोस काय? शुष्क भुसाच्या पाठीस लागतोस काय? |
|
| 26 |
|
| तू माझ्या नावावर कठीण शिक्षा लिहितोस, माझ्या तारुण्यातील पातकांचे फळ मला भोगायला लावतोस. |
|
| 27 |
|
| तू माझे पाय खोड्यांत घालतोस आणि माझ्या सगळ्या चालचलणुकीवर नजर ठेवतोस; तू माझ्या पावलांभोवती रेषा मारतोस. |
|
| 28 |
|
| मी सडलेल्या वस्तूप्रमाणे, कसरीने खाल्लेल्या वस्त्राप्रमाणे जीर्ण झालो आहे.” |
|
|
|
|