|
| 1 |
|
| “माझ्या नेत्रांनी हे सर्व पाहिले आहे, माझ्या कानांनी ते ऐकले आणि समजले. |
|
| 2 |
|
| जे तुम्हाला माहीत आहे, ते मलाही माहीत आहे; मी तुमच्यापेक्षा कमी दर्जाचा नाही. |
|
| 3 |
|
| पण मी सर्वसमर्थाशी बोलावे आणि माझा वाद परमेश्वरासमोर मांडावा असे मी इच्छितो. |
|
| 4 |
|
| तुम्ही तर मला लबाड्यांनी कलंकित करता; तुम्ही सर्व अयोग्य वैद्य आहात! |
|
| 5 |
|
| तुम्ही गप्प राहाल तर किती बरे होईल! कारण त्यातच तुमचे शहाणपण आहे. |
|
| 6 |
|
| आता माझा वाद ऐकून घ्या; माझ्या ओठांच्या विनंतीकडे कान द्या. |
|
| 7 |
|
| परमेश्वराच्या वतीने तुम्ही दुष्टतेने बोलणार का? त्यांच्याकरिता तुम्ही कपटाचे भाषण कराल का? |
|
| 8 |
|
| तुम्ही त्यांना पक्षपात दाखविणार का? परमेश्वराच्या वतीने त्यांचा वाद तुम्ही कराल काय? |
|
| 9 |
|
| त्यांनी जर तुमची परीक्षा केली तर चांगले होईल काय? जसे मनुष्याला तसे तुम्ही परमेश्वरालाही फसवू शकाल काय? |
|
| 10 |
|
| जर तुम्ही गुप्तपणे पक्षपात कराल तर परमेश्वर तुमच्याकडून निश्चितच हिशोब मागेल. |
|
| 11 |
|
| त्यांचे वैभव तुम्हाला भयभीत करीत नाही का? त्यांचे भय तुम्हावर पडणार नाही का? |
|
| 12 |
|
| तुमच्या नीतिवचनांना राखेएवढेच मोल आहे; तुमचे रक्षण हा मातीचा बचाव आहे. |
|
| 13 |
|
| “आता गप्प राहा व मला बोलू द्या; मग माझ्यावर जे यावयाचे ते येवो. |
|
| 14 |
|
| मी स्वतःला धोक्यात का टाकू आणि माझे जीवन माझ्याच हातात का घेऊ? |
|
| 15 |
|
| जरी परमेश्वराने मला मारून टाकले, तरीही मी त्यांच्यावर आशा ठेवेन; व खचितच त्यांच्यासमोर मी माझ्या मार्गाचे समर्थन करेन. |
|
| 16 |
|
| खचितच ह्यातच माझी खरी मुक्ती आहे, कारण कोणी देवहीन व्यक्ती त्यांच्यासमोर येण्याचे धाडस करणार नाही! |
|
| 17 |
|
| मी जे सांगतो, ते लक्ष देऊन ऐका; माझे शब्द तुमच्या कानावर पडू द्या. |
|
| 18 |
|
| मी माझा वाद तयार केला आहे, मला माहीत आहे की मी दोषमुक्त ठरेन. |
|
| 19 |
|
| माझ्याविरुद्ध कोणी आरोप करेल काय? केलाच तर, मी शांत राहीन आणि मरून जाईन. |
|
| 20 |
|
| “हे परमेश्वरा, मला या दोन गोष्टी द्या, आणि मग मी तुमच्यापासून लपणार नाही: |
|
| 21 |
|
| माझ्यावरील आपला हात दूर करा, आणि तुमच्या धाकाने मला आणखी घाबरवू नका. |
|
| 22 |
|
| मला आवाज द्या आणि मी उत्तर देईन, किंवा मी बोलेन आणि तुम्ही मला उत्तर द्या. |
|
| 23 |
|
| मी किती चुका आणि पाप केलेत? माझे पाप आणि माझे अपराध मला दाखवा. |
|
| 24 |
|
| तुम्ही आपले मुख का लपविता आणि मला आपला शत्रू का मानता? |
|
| 25 |
|
| वार्याने उडून जाणार्या पानाला तुम्ही छळणार का? कोरड्या भुशाचा तुम्ही पाठलाग करणार का? |
|
| 26 |
|
| कारण माझ्याविरुद्ध तुम्ही कटुत्वाच्या गोष्टी लिहिता, आणि माझ्या तारुण्यातील पातकांची शिक्षा मला देता. |
|
| 27 |
|
| तुम्ही माझ्या पायात बेड्या घालता; माझ्या पायांच्या तळव्यांना चिन्ह करून माझ्या सर्व मार्गावर तुम्ही लक्ष ठेवले आहे. |
|
| 28 |
|
| “सडलेल्या वस्तूप्रमाणे, कसरीने खाल्लेल्या वस्त्राप्रमाणे मनुष्य नष्ट होतो. |
|
|
|
|