|
| 1 |
|
| “स्त्रीपासून जन्मलेल्या मानवाचे जीवन, अल्पकालीन व त्रासाने भरलेले आहे. |
|
| 2 |
|
| अशा फुलासारखे, जे फुलते आणि सुकून जाते; क्षणभंगुर सावलीप्रमाणे ते जास्त काळ टिकत नाही. |
|
| 3 |
|
| अशा मानवांवर तुम्ही आपली नजर लावता का? त्यांचा न्याय करण्यासाठी त्यांना आपल्या उपस्थितीत आणणार का? |
|
| 4 |
|
| अशुद्धतेतून जे शुद्ध ते कोण उत्पन्न करेल? कोणीही नाही! |
|
| 5 |
|
| मानवाचे दिवस ठरलेले आहेत; त्याच्या महिन्यांची संख्या तुमच्या स्वाधीन आहे आणि त्याची नेमलेली मर्यादा त्याला ओलांडता येत नाही. |
|
| 6 |
|
| रोजगाराच्या मजुराप्रमाणे त्याची वेळ पूर्ण होईपर्यंत, आपली दृष्टी त्याच्यावरून काढून त्याला एकटे असू द्या. |
|
| 7 |
|
| “झाडाला देखील आशा असते: की त्याला कापून टाकले तरी ते पुन्हा फुटणार, आणि त्याच्या नवीन फांद्या कोमेजणार नाहीत. |
|
| 8 |
|
| मातीत त्याची मुळे जुनी झाली असली, आणि त्याचा बुंधा मातीत मृत झाला असला, |
|
| 9 |
|
| तरी पाण्याच्या सुगंधाने ते फुलते आणि रोपट्याप्रमाणे, त्याला पुन्हा कोंब फुटतात. |
|
| 10 |
|
| परंतु मनुष्य मरण पावतो व त्याला पुरले जाते; तो आपला शेवटचा श्वास घेतो आणि नाहीसा होतो. |
|
| 11 |
|
| जसे सरोवराचे पाणी आटते किंवा नदीचे पात्र आटून कोरडे होते, |
|
| 12 |
|
| तसा मनुष्य पडल्यावर पुन्हा उठत नाही; आकाश नाहीसे होईपर्यंत लोक पुन्हा उठणार नाहीत, ते झोपेतून जागे केले जाणार नाहीत. |
|
| 13 |
|
| “तुम्ही केवळ मला कबरेमध्ये लपविले असते तुमचा क्रोध संपेपर्यंत मला गुप्त ठेवले असते! आपण माझ्यासाठी समय नेमून ठेवावा आणि मग माझी आठवण करावी! |
|
| 14 |
|
| जर कोणी मेला तर पुन्हा जिवंत होईल का? माझ्या सर्व कठीण श्रमाच्या दिवसात माझ्या सुटकेची मी वाट पाहीन. |
|
| 15 |
|
| मग तुम्ही मला आवाज द्याल आणि मी तुम्हाला उत्तर देईन; आपली हस्तकृती पुन्हा पाहावी असे तुम्हाला वाटेल. |
|
| 16 |
|
| तेव्हा खचित आपण माझ्या पापांची नाही, तर माझ्या पावलांची मोजणी कराल. |
|
| 17 |
|
| तुम्ही माझे अपराध एका थैलीत बंद करून; माझ्या पापांवर पांघरूण घालाल. |
|
| 18 |
|
| “परंतु जसे पर्वत झिजतात व त्यांचा चुरा होतो, आणि जसे खडक आपल्या ठिकाणातून ढळविले जातात, |
|
| 19 |
|
| जल पाषाण झिजवून टाकते व पूर माती वाहून नेतो, त्याचप्रमाणे तुम्ही मानवाची आशा नष्ट करता. |
|
| 20 |
|
| तुम्ही एकदाच मानवावर प्रबळ होता आणि तो नाहीसा होतो; तुम्ही त्याचा चेहरा बदलता आणि त्याला दूर पाठवून देता. |
|
| 21 |
|
| जरी त्याच्या संतानाचा सन्मान झाला, तरी त्याला ते माहीत नसते; किंवा त्यांना नीच करण्यात आले, तरी ते त्याला दिसत नाही. |
|
| 22 |
|
| त्यांना फक्त त्यांच्या शरीरातील दुःख जाणवते आणि स्वतःसाठीच ते शोक करतात.” |
|
|
|
|