|
| 1 |
|
| मग एलीफाज तेमानीने उत्तर देऊन म्हटले: |
|
| 2 |
|
| “सुज्ञ मनुष्य पोकळ मताने उत्तर देईल का किंवा पूर्वेकडील गरम वार्याने आपले पोट भरणार काय? |
|
| 3 |
|
| कुचकामी शब्दांनी, आणि व्यर्थ भाषणाने ते वाद घालतील काय? |
|
| 4 |
|
| परंतु तू तर धार्मिकता देखील कमी लेखतोस आणि परमेश्वराच्या भक्तीत अडखळण आणतो. |
|
| 5 |
|
| तुझी पापे तुझ्या मुखाला संकेत देतात; धूर्तांची जीभ तू अंगीकारतो. |
|
| 6 |
|
| माझे नव्हे, तर तुझे स्वतःचे मुख तुला दोषी ठरविते; तुझे स्वतःचे ओठ तुझ्याविरुद्ध साक्ष देते. |
|
| 7 |
|
| “सर्व मानवजातीमध्ये तू प्रथम जन्मलेला आहेस का? पर्वत निर्माण होण्यापूर्वी तू अस्तित्वात आला का? |
|
| 8 |
|
| परमेश्वराची मसलत तू ऐकतोस काय? शहाणपणाचा ठेका तुझ्याकडे आहे का? |
|
| 9 |
|
| आम्हाला माहीत नाही, अशी तुला काय माहिती आहे? आम्हाला आहे, त्याहून अधिक कोणते ज्ञान तुला आहे? |
|
| 10 |
|
| केस पांढरे झालेले आणि वयोवृद्ध पुरुष आमच्यामध्ये आहेत; जे तुझ्या वडिलांपेक्षाही अधिक वयाचे आहेत. |
|
| 11 |
|
| परमेश्वराचे सांत्वन आणि सौम्यतेचे शब्द तुझ्यासाठी पुरेसे नाहीत का? |
|
| 12 |
|
| तुझ्या मनाने तुला का वाहवत नेले आहे, तुझे डोळे असे का चमकतात, |
|
| 13 |
|
| यासाठी की आपला क्रोध तू परमेश्वरावर दाखवावा आणि तुझ्या मुखातून असे शब्द ओतावे? |
|
| 14 |
|
| “मनुष्यप्राणी काय आहेत की ते शुद्ध असावेत, किंवा स्त्रीपासून जन्मलेले नीतिमान असावेत? |
|
| 15 |
|
| जर परमेश्वर आपल्या पवित्र जनांचाही देखील भरवसा करीत नाही, त्यांच्या दृष्टीने जर प्रत्यक्ष स्वर्गदेखील शुद्ध नाही, |
|
| 16 |
|
| तर असत्य आणि भ्रष्ट मनुष्य जो पाण्याप्रमाणे दुष्टता पितो, तो किती कमी दर्जाचा असावा! |
|
| 17 |
|
| “माझे लक्षपूर्वक ऐक, मी तुला स्पष्ट करून सांगतो; मी जे पाहिले आहे ते तुला सांगू दे, |
|
| 18 |
|
| ज्ञानी लोकांनी जे त्यांच्या पूर्वजांपासून मिळविले, त्यातील काहीच गुपित न ठेवता ते जाहीर केले, |
|
| 19 |
|
| (ज्यांना केवळ ही भूमी देण्यात आली होती आणि त्यांच्यामध्ये कोणीही विदेशी नव्हता): |
|
| 20 |
|
| दुष्ट मनुष्य त्याच्या सर्व आयुष्यभर, तर निर्दयी मनुष्य त्याच्यासाठी राखलेली सर्व वर्षे यातना सहन करतो. |
|
| 21 |
|
| त्याचे कान भयाच्या शब्दाने भरतात; सर्वकाही चांगले असताना विध्वंसक त्याच्यावर हल्ला करतो. |
|
| 22 |
|
| अंधारातून सुटकेची आशा त्याला नाही; तलवारीसाठी त्याला नेमले आहे. |
|
| 23 |
|
| गिधाडा सारखा तो आपल्या अन्नासाठी भटकतो; अंधकाराचा दिवस जवळ आहे, हे त्याला माहीत आहे. |
|
| 24 |
|
| संकट व चिंता त्याला घाबरे करतात; हल्ला करण्यास सज्ज झालेल्या राजासारखे ती त्याला जेरीस आणतात, |
|
| 25 |
|
| कारण परमेश्वराकडे तो आपली मूठ फिरवितो आणि सर्वसमर्थ्या विरुद्ध स्वतःची बढाई मिरवतो, |
|
| 26 |
|
| त्यांच्या विरोधात अपमानाने जाड आणि मजबूत ढाल घेऊन तो दोष लावतो. |
|
| 27 |
|
| “कारण या दुष्ट माणसाच्या अंगावर चरबी चढलेली आहे; त्याच्या कंबरेवर मांस चढले आहे, |
|
| 28 |
|
| पडीक नगरांमध्ये तो वास्तव्य करेल, कोणी राहत नाही अशा ठिकाणी, तुकडे पडलेल्या घरामध्ये त्याचा डेरा असेल. |
|
| 29 |
|
| त्याची श्रीमंती आणि त्याची संपत्ती टिकणार नाही, ना पृथ्वीवर त्याची मालमत्ता वाढणार. |
|
| 30 |
|
| त्याला अंधकारातून सुटका नाही; अग्नीने त्याचा अंकुर जळून जाईल, परमेश्वराचा मुखश्वास त्याला दूर वाहून नेईल. |
|
| 31 |
|
| निरर्थक धनावर विसंबून राहून त्याने स्वतःची फसवणूक करून घेऊ नये, कारण त्याला त्याचा काही लाभ मिळणार नाही. |
|
| 32 |
|
| त्याच्या ठरलेल्या वेळे आधी तो गळून जाईल, आणि त्याच्या फांद्या भरभराट पावणार नाहीत. |
|
| 33 |
|
| न पिकलेले द्राक्ष झडून गेलेल्या द्राक्षवेलीसारखा, बहर गाळून टाकत असलेल्या जैतुनाच्या झाडासारखा तो होईल. |
|
| 34 |
|
| कारण देवहीनांचे सोबती निष्फळ होतील, आणि लाच घेणार्यांचे डेरे अग्नी जाळून टाकील. |
|
| 35 |
|
| ते क्लेशाची गर्भधारणा करतात आणि दुष्टतेला जन्म देतात; आणि त्यांचे गर्भाशय कपट प्रसवते.” |
|
|
|
|