|
| 1 |
|
| यावर इय्योब म्हणाला: |
|
| 2 |
|
| “अशा पुष्कळ गोष्टी मी ऐकल्या आहेत; तुम्ही सर्व पोकळ सांत्वनकर्ते आहात! |
|
| 3 |
|
| तुमच्या या लांबलचक भाषणांचा कधी शेवट होणार नाही का? तुम्हाला काय त्रास होत आहे की तुम्ही सतत वाद घालावे? |
|
| 4 |
|
| तुम्ही माझ्या जागी असता, तर मी सुध्दा तुमच्यासारखेच बोललो असतो; मीही तुमच्याविरुद्ध उत्तम भाषण दिले असते आणि तुम्हाकडे पाहून माझे डोके हालविले असते. |
|
| 5 |
|
| परंतु माझे मुख तुम्हाला प्रोत्साहित करेल; तुम्हाला आराम मिळावा म्हणून माझ्या ओठांनी मी तुमचे सांत्वन करेन. |
|
| 6 |
|
| “परंतु मी जरी बोललो तरी, माझे दुःख कमी होत नाही; आणि जरी मी गप्प राहिलो तरी ते जात नाही. |
|
| 7 |
|
| खचितच, हे परमेश्वरा, तुम्ही मला झिजवून टाकले आहे; तुम्ही माझे घरदार उजाड केले आहे. |
|
| 8 |
|
| तुम्ही मला अगदी शुष्क असे केले आहे—आणि तेच माझे साक्षीदार आहेत. माझी ओसाडी उठून माझ्याविरुद्ध साक्ष देते. |
|
| 9 |
|
| परमेश्वर माझ्यावर तुटून पडतात आणि आपल्या क्रोधाने मला फाडून टाकतात, आणि माझ्यावर दात खातात; माझे विरोधी माझ्यावर कडक नजर लावून आहेत. |
|
| 10 |
|
| ते आपले मुख उघडून माझी थट्टा करतात; तिरस्काराने ते माझ्या गालावर मारतात. आणि माझ्याविरुद्ध एकजूट करतात. |
|
| 11 |
|
| परमेश्वराने मला देवहीनांच्या स्वाधीन केले आहे आणि दुष्टांच्या तावडीत सोपविले आहे. |
|
| 12 |
|
| मी सुखात राहत होतो, परंतु त्यांनी मला विखरून टाकले आहे. माझ्या मानेला पकडून त्यांनी माझा चुराडा केला आहे. त्यांनी मला त्यांचा निशाणा म्हणून केले आहे; |
|
| 13 |
|
| त्यांचे बाण माझ्या सभोवती आहेत. दया विरहित ते माझी आतडी छेदतात आणि माझे पित्त भूमीवर ओततात. |
|
| 14 |
|
| पुनः पुनः ते माझ्यावर हल्ला करतात; एखाद्या योद्ध्यांप्रमाणे ते माझ्यावर धावून येतात. |
|
| 15 |
|
| “मी गोणपाटाने माझे शरीर झाकले आहे आणि माझे डोके धुळीला मिळविले आहे. |
|
| 16 |
|
| रडून रडून माझा चेहरा लाल झाला आहे, आणि माझ्या डोळ्यांभोवती काळे डाग पडले आहेत. |
|
| 17 |
|
| तरीही माझ्या हातांनी जुलूम केला नाही आणि माझी प्रार्थना शुद्ध आहे. |
|
| 18 |
|
| “अगे पृथ्वी, माझे रक्त झाकून ठेवू नकोस; माझे रुदन कधीही विश्रांती न पावो! |
|
| 19 |
|
| तरी आतासुद्धा माझा साक्षीदार स्वर्गामध्ये आहे; माझा कैवारी उच्चस्थानी आहे. |
|
| 20 |
|
| माझा मध्यस्थ माझा मित्र आहे आणि परमेश्वरासमोर माझे नेत्र अश्रू गाळतात; |
|
| 21 |
|
| एखादा मनुष्य जसा आपल्या मित्रासाठी तसाच तो एका मनुष्याच्या वतीने परमेश्वराजवळ विनवणी करतो. |
|
| 22 |
|
| “केवळ काही वर्षे निघून जातील आणि फिरून परत येत नाही त्या वाटेने मी रवाना होईल. |
|
|
|
|