पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| माझा आत्मा तुटून गेला आहे, माझ्या आयुष्याचे दिवस छाटले गेले आहे, कबर माझी वाट पाहत आहे. |
| 2 |
| खचितच थट्टा करणारे मला घेरून घेतात; त्यांच्या वैरभावावर माझी नजर लागली आहे. |
| 3 |
| “हे परमेश्वरा तुमच्या वचनानुसार माझ्याबरोबर करार करा. कारण मला जामीन आणखी कोण आहे? |
| 4 |
| तुम्ही त्यांचे मन सुज्ञतेस वंचित केले आहे; म्हणून तुम्ही त्यांना विजयी होऊ देणार नाही. |
| 5 |
| जे मोबदल्यासाठी आपल्या मित्रांचा घात करतात, त्यांच्या लेकरांचे डोळे अंध होतील. |
| 6 |
| “परमेश्वराने मला सर्वांसाठी थट्टेचा विषय केले आहे, असा मनुष्य, ज्याच्या तोंडावर लोक थुंकतात. |
| 7 |
| दुःखाने माझे डोळे अंधुक झाले आहेत; आणि माझे शरीर सावलीसारखे झाले आहे. |
| 8 |
| यामुळे प्रामाणिक लोक भयप्रद झाले आहेत; निर्दोष लोक देवहीनांवर उठले आहेत. |
| 9 |
| तरीही, नीतिमान आपल्या मार्गात स्थिर राहतील, आणि शुद्ध हृदयाचे लोक अधिक बलवान होत जातील. |
| 10 |
| “परंतु चला, तुम्ही सर्वजण पुन्हा प्रयत्न करा! तुमच्यात एकही बुद्धिमान मला सापडणार नाही. |
| 11 |
| माझे दिवस निघून गेले आहेत, माझ्या योजना विखुरल्या आहेत. परंतु माझ्या हृदयाची आशा भंगली नाही. |
| 12 |
| ते रात्रीला दिवसात बदलतात; आणि अंधारात असूनही दिवस जवळ आहे असे म्हणतात. |
| 13 |
| ज्या घराची मी आशा धरतो, ती जर कबर आहे, अंधकाराच्या राज्यात जर मी माझे अंथरूण पसरेल, |
| 14 |
| जर कुजण्याला, ‘तू माझा पिता आहेस’ असे म्हटले आणि किडण्याला, ‘माझी आई’ किंवा ‘माझी बहीण’ म्हणेन, |
| 15 |
| तर मग माझी आशा कुठे आहे— आणि कोण माझ्यासाठी आशावादी असणार? |
| 16 |
| ती अधोलोकाच्या द्वारात जाणार का? आम्ही दोघेही धुळीमध्ये एकत्रच जाणार का?” |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/job/017.mp3
42
17