पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| मग बिल्दद शूही म्हणाला, |
| 2 |
| “तुम्ही कोठवर शब्द शोधून योजत बसाल? तुम्ही समज घ्या, मग आम्ही बोलू. |
| 3 |
| तुमच्या हिशोबी आम्ही पशू का ठरलो? तुमच्या दृष्टीने आम्ही अशुद्ध का झालो? |
| 4 |
| अरे क्रोधाने स्वतःस फाडून टाकणार्या, तुझ्यामुळे पृथ्वी ओस पडेल काय? खडक आपल्या ठिकाणचा ढळेल काय? |
| 5 |
| तरी दुष्टाचा दीप मालवेल, त्याच्या अग्नीची ज्वाला झळकणार नाही. |
| 6 |
| त्याच्या डेर्यातला प्रकाशाचा अंधकार होईल, त्याचा लामणदिवा विझून जाईल. |
| 7 |
| त्याच्या जोराच्या ढांगा संकोच पावतील, त्याचीच युक्ती त्याचा निःपात करील. |
| 8 |
| तो आपल्या पायांनी जाळ्यात अडकतो, तो पाशात पाऊल टाकत आहे. |
| 9 |
| त्याची टाच सापळ्यात अडकते; पाश त्याला धरून ठेवतो. |
| 10 |
| त्याच्यासाठी पाश जमिनीत गुप्त ठेवला आहे; त्याच्या मार्गात सापळा ठेवला आहे. |
| 11 |
| त्याला दहशत चोहोकडून घाबरे करते; ती त्याचा पिच्छा पुरवते. |
| 12 |
| त्याची शक्ती क्षुधिताप्रमाणे क्षीण होईल; तो केव्हा पडेल ह्याची अरिष्ट वाट पाहत आहे. |
| 13 |
| ते त्याच्या शरीराचे अवयव तोडून खाईल; मृत्यूचा ज्येष्ठ पुत्र त्याचे अवयव ग्रासील. |
| 14 |
| ज्या डेर्याचा तो भरवसा धरी त्यातून त्याला ओढून काढतील; त्याला भयाच्या राजापुढे हजर करतील. |
| 15 |
| जे त्याचे नव्हत ते त्याच्या डेर्यात वास करतील त्याच्या वसतिस्थानांवर गंधक उधळतील. |
| 16 |
| खालून त्याचे मूळ सुकेल, व वरून त्याची डाहळी छाटतील. |
| 17 |
| देशातून त्याची आठवण बुजेल, व पेठेत त्याचे नाव राहणार नाही. |
| 18 |
| ते त्याला प्रकाशातून अंधकारात लोटतील, त्याला जगातून पळवतील. |
| 19 |
| त्याच्या लोकांत त्याचे कोणी पुत्रपौत्र आढळणार नाहीत; त्याच्या बिर्हाडात कोणी उरणार नाही. |
| 20 |
| त्याचा दुर्दिन पाहून पश्चिमेकडे राहणारे चकित होतील, पूर्वेकडे राहणारे कंपित होतील. |
| 21 |
| कुटिलाच्या निवासांचे निःसंशय असेच होणार; देवाला न ओळखणार्याच्या स्थानाचे असेच होणार.” |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/job/018.mp3
42
18