|
| 1 |
|
| मग ईयोबाने प्रत्युत्तर केले, |
|
| 2 |
|
| “तुम्ही कोठवर माझ्या जिवाला दुःख देणार? कोठवर आपल्या शब्दांनी माझा चुराडा करणार? |
|
| 3 |
|
| एवढ्यात दहा वेळा तुम्ही माझी अप्रतिष्ठा केली; तुम्ही माझ्याशी निष्ठुरतेने वागता ह्याची तुम्हांला लाज कशी वाटत नाही? |
|
| 4 |
|
| मी काही चूक केलीच असली, तर ती माझी मला. |
|
| 5 |
|
| तुम्ही माझ्यावर खरोखर तोरा मिरवणार आणि माझ्या पदरी अप्रतिष्ठा घालणार, |
|
| 6 |
|
| तर हे लक्षात ठेवा की देवानेच माझा विपरीत न्याय केला आहे; त्याने माझ्यावर आपले जाळे टाकले आहे. |
|
| 7 |
|
| मी ‘जुलूम! जुलूम!’ असे ओरडतो पण कोणी ऐकत नाही; मी दाद मागतो पण मला न्याय मिळत नाही. |
|
| 8 |
|
| त्याने माझा रस्ता अडवला आहे. मला पुढे जाता येत नाही; त्याने माझ्या मार्गावर अंधकार पाडला आहे; |
|
| 9 |
|
| त्याने माझे वैभव हरण केले आहे; माझ्या डोक्यावरला मुकुट त्याने काढला आहे |
|
| 10 |
|
| त्याने मला चोहोकडून भग्न केले आहे व माझे आटोपले आहे; त्याने वृक्षाप्रमाणे माझी आशा उपटून टाकली आहे. |
|
| 11 |
|
| त्याने माझ्यावर आपला कोप भडकवला आहे; तो मला आपल्या शत्रूंत गणत आहे. |
|
| 12 |
|
| त्यांच्या फौजा जमून माझ्यावर मोर्चा लावत आहेत; त्यांनी माझ्या डेर्याभोवती तळ दिला आहे. |
|
| 13 |
|
| त्याने माझ्या भाऊबंदांना माझ्यापासून दूर केले आहे; माझ्या ओळखीपाळखीचे मला पारखे झाले आहेत. |
|
| 14 |
|
| माझे आप्त मला अंतरले आहेत; माझे इष्टमित्र मला विसरले आहेत. |
|
| 15 |
|
| माझ्या घरचे दास व दासी मला परका समजतात; त्यांच्या दृष्टीने मी विदेशी झालो आहे. |
|
| 16 |
|
| माझ्या दासाला मी हाक मारतो तरी तो मला उत्तर देत नाही; मला तोंडाने त्याची विनवणी करावी लागते. |
|
| 17 |
|
| माझा श्वास माझ्या स्त्रीला अप्रिय वाटतो; माझ्या सहोदरांना माझी किळस येते. |
|
| 18 |
|
| पोरेसोरेदेखील मला तुच्छ लेखतात; मी उठायला लागलो असता माझी चेष्टा करतात. |
|
| 19 |
|
| माझे सगळे जिवलग मित्र माझा तिटकारा करतात; ज्यांच्यावर मी प्रेम करी ते माझ्यावर उलटले आहेत. |
|
| 20 |
|
| माझे मांसचर्म जीर्ण होऊन हाडांना लागले आहे; मी केवळ दातांच्या कातडीनिशी बचावलो आहे. |
|
| 21 |
|
| माझ्या मित्रांनो, माझ्यावर दया करा हो, दया करा; कारण देवाचा हात माझ्यावर पडला आहे. |
|
| 22 |
|
| देव करीत आहे तसा तुम्ही माझा छळ का करता? तुम्ही असोशीने माझे मांस का तोडता? |
|
| 23 |
|
| माझे शब्द लिहून काढले, ते ग्रंथात लिहून ठेवले, |
|
| 24 |
|
| लोखंडी कलमाने शिळेवर खोदून त्यात शिसे भरून ते कायमचे केले, तर किती बरे होईल! |
|
| 25 |
|
| मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे. तो अंती पृथ्वीवर उभा राहील; |
|
| 26 |
|
| ही माझी त्वचा छिन्नभिन्न होऊन नष्ट झाली, तरी मी देवाला देहविरहित पाहीन; |
|
| 27 |
|
| त्याला मी स्वतः पाहीन, इतरांचे नव्हे तर माझेच नेत्र त्याला पाहतील. माझा अंतरात्मा झुरत आहे! |
|
| 28 |
|
| ह्या सगळ्याचे मूळ माझ्या ठायीच आढळून आले आहे, म्हणून ‘ह्याचा छळ आपण कोणत्या प्रकारे करावा,’ असे तुम्ही म्हणाल, |
|
| 29 |
|
| तर तुम्ही तलवारीचे भय धरा; कारण क्रोधाबद्दल तलवारीचे शासन होते, ह्यावरून न्याय आहे हे तुम्हांला समजावे.” |
|
|
|
|