|
| 1 |
|
| मग इय्योबाने उत्तर देत म्हटले: |
|
| 2 |
|
| “किती काळ तुम्ही मला त्रास देणार आणि आपल्या शब्दांनी मला चिरडणार? |
|
| 3 |
|
| एवढ्यात दहा वेळा माझी निंदा करून; निर्लज्या सारखा तुम्ही माझ्यावर हल्ला केला. |
|
| 4 |
|
| मी जर खरोखरच चुकलो असेन, तरी त्यासाठी मी स्वतः जबाबदार असणार. |
|
| 5 |
|
| जर स्वतःला तुम्ही खरच माझ्यापेक्षा थोर समजता आणि माझ्या या दैनावस्थेचा माझ्याविरुद्ध गैरउपयोग करता, |
|
| 6 |
|
| तर ही गोष्ट लक्षात घ्या, की ही स्थिती परमेश्वराने माझ्यावर आणली आहे आणि आपल्या जाळ्यात मला वेढले आहे. |
|
| 7 |
|
| “मी जरी ‘जुलूम!’ असे म्हणून ओरडतो, परंतु मला प्रतिसाद मिळत नाही; साहाय्यासाठी मी बोलावितो, परंतु मला न्याय मिळत नाही. |
|
| 8 |
|
| मी पार जाऊ नये म्हणून परमेश्वराने माझी वाट अडविली आहे; त्यांनी माझे मार्ग अंधाराने झाकून टाकले आहेत. |
|
| 9 |
|
| माझा सन्मान त्यांनी माझ्यापासून हिरावून घेतला आहे आणि माझ्या मस्तकावरील मुकुट काढून घेतला आहे. |
|
| 10 |
|
| माझा सर्वनाश होईपर्यंत त्यांनी मला चहूकडून तोडले आहे; झाडाप्रमाणे त्यांनी माझी आशा उपटून टाकली आहे. |
|
| 11 |
|
| त्यांचा क्रोध माझ्याविरुद्ध भडकला आहे; आपल्या शत्रूंमध्ये त्यांनी मला गणले आहे. |
|
| 12 |
|
| त्यांची फौज जोमाने पुढे जात आहे; त्यांनी माझ्याविरुद्ध युद्ध रचले आहे आणि माझ्या डेर्या सभोवती वेढा घातला आहे. |
|
| 13 |
|
| “माझे बंधुजन त्यांनी माझ्यापासून दूर केले आहेत; माझे परिचित मला अगदी परके झाले आहेत. |
|
| 14 |
|
| माझे नातलग माझ्यापासून दूर गेले आहेत; माझ्या जिवलग मित्रांना माझा विसर पडला आहे. |
|
| 15 |
|
| माझे पाहुणे आणि माझ्या सेविका सुद्धा मला परके मानतात; अनोळखी माणसाप्रमाणे ते माझ्याकडे बघतात. |
|
| 16 |
|
| मी माझ्या सेवकाला आज्ञा करतो, आणि माझ्या मुखाने त्याला विनवणी करतो, परंतु तो उत्तर देत नाही. |
|
| 17 |
|
| माझ्या पत्नीसाठी माझा श्वास किळसवाणा झाला आहे; माझ्या परिवारासाठी मी घृणास्पद असा आहे. |
|
| 18 |
|
| लहान मुलेदेखील माझी निंदा करतात; मी दिसलो तरी ते माझा अपमान करतात. |
|
| 19 |
|
| माझ्या जिवलग मित्रांनादेखील माझा वीट येतो; ज्यांच्यावर मी प्रीती केली, तेही माझ्यावर उलटले. |
|
| 20 |
|
| मी आता फक्त हाडे व कातडी असा उरलो आहे; आणि मृत्यूच्या संकटातून थोडक्यात निभावून गेलो आहे. |
|
| 21 |
|
| “माझ्यावर दया करा, माझ्या मित्रांनो, माझ्यावर दया करा, कारण परमेश्वराच्या हाताने माझ्यावर प्रहार केला आहे. |
|
| 22 |
|
| परमेश्वराने करावा असा तुम्हीही माझा छळ का करता? माझ्या वेदना पाहून तुमचे समाधान झाले नाही काय? |
|
| 23 |
|
| “अहा, माझ्या शब्दांची नोंद करण्यात आली असती, ते एका चर्मपत्राच्या गुंडाळीत लिहून ठेवले असते, |
|
| 24 |
|
| लोखंडी कलमाने ते शिसावर, किंवा कायम स्वरुपाने खडकावर कोरले असते तर किती बरे होते! |
|
| 25 |
|
| मला ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे, आणि अखेरीस ते पृथ्वीवर उभे राहील; |
|
| 26 |
|
| आणि हे शरीर कुजून गेल्यानंतरही, आपल्या देहाशिवाय मी परमेश्वराला पाहीन; |
|
| 27 |
|
| होय, मी स्वतः त्यांना पाहीन दुसरा कोणी नाही; तर मी स्वतःच्या डोळ्यांनी मी त्यांना पाहीन. त्यासाठी माझ्या हृदयात मी किती उतावळा झालो आहे! |
|
| 28 |
|
| “आणि आता जर तुम्ही असा विचार केला की, ‘आम्ही कसे त्याला नीच करू, कारण समस्येचे मूळ तर त्याच्यामध्येच आहे,’ |
|
| 29 |
|
| तुम्ही स्वतः तलवारी विषयी भय धरावे; कारण क्रोधाची शिक्षा तलवारीने येणार, आणि मग न्याय अस्तित्वात आहे हे तुम्हाला समजेल. ” |
|
|
|
|