|
| 1 |
|
| मग सोफर नामाथी म्हणाला, |
|
| 2 |
|
| “माझे विचार मला उत्तर सुचवतात, हे माझ्या ठायीच्या स्फूर्तीने होत आहे. |
|
| 3 |
|
| माझ्या अप्रतिष्ठेला कारण होणारी निर्भर्त्सना मला ऐकणे प्राप्त झाले, म्हणून माझ्या बुद्धीप्रमाणे माझे मन मला उत्तर सुचवते. |
|
| 4 |
|
| मानवाची पृथ्वीवर स्थापना झाली तेव्हापासूनचा हा सनातन नियम तुला ठाऊक नाही काय? |
|
| 5 |
|
| की दुर्जनांचा जयजयकार अल्पकालिक असतो; अधर्म्याचा आनंद केवळ क्षणिक असतो. |
|
| 6 |
|
| त्याचे माहात्म्य गगनास जाऊन पोहचले; त्याचे शिर मेघमंडळास जाऊन लागले, |
|
| 7 |
|
| तरी त्याच्या विष्ठेप्रमाणे त्याचा कायमचा नाश होईल; त्याला जे पाहत असत ते विचारतील, ‘तो कोठे गेला?’ |
|
| 8 |
|
| तो स्वप्नाप्रमाणे उडून जाईल, कोणाच्या हाती सापडणार नाही; रात्रीच्या आभासाप्रमाणे त्याला घालवून देतील, |
|
| 9 |
|
| ज्या नेत्रांना तो दिसला त्यांना तो पुनरपि दिसणार नाही. त्याच्या ठिकाणाला त्याचे पुन्हा दर्शन होणार नाही. |
|
| 10 |
|
| त्याची मुलेबाळे गरिबांचे आर्जव करतील; त्याचे हात त्याने लुबाडलेले वित्त परत करतील. |
|
| 11 |
|
| त्याच्या हाडांत तारुण्याचा जोम भरला आहे; पण तो त्याच्याबरोबर मातीस मिळेल. |
|
| 12 |
|
| दुष्टता त्याच्या जीभेला गोड लागली, ती त्याने जिभेखाली दाबून ठेवली, |
|
| 13 |
|
| ती त्याने तशीच राखून ठेवली, सोडली नाही, आपल्या तोंडातच धरून ठेवली, |
|
| 14 |
|
| तरी त्याचे अन्न त्याच्या पोटात पालटून त्याचे त्याच्या ठायी फुरशांचे विष बनेल. |
|
| 15 |
|
| त्याने धन गिळले होते ते तो ओकून टाकील. देव ते त्याच्या पोटातून बाहेर काढील. |
|
| 16 |
|
| तो फुरशांचे विष चोखील; नागाचा दंश त्याचा प्राण हरण करील, |
|
| 17 |
|
| त्याला नद्यांचे म्हणजे अर्थात मधाचे, दूधदुभत्याचे प्रवाह व ओघ ह्यांचे दर्शन व्हायचे नाही. |
|
| 18 |
|
| त्याने श्रम करून मिळवले ते त्याने परत दिले पाहिजे, त्याला ते गिळून टाकता येणार नाही; त्याने मिळवलेल्या धनाच्या मानाने त्याला आनंद लाभणार नाही. |
|
| 19 |
|
| तो दुबळ्यांस चिरडून तसाच टाकून गेला आहे; म्हणून त्याने जबरीने एखादे घर घेतल्यास ते त्याला वाढवून बांधता येणार नाही. |
|
| 20 |
|
| त्याच्या मनाला तृप्ती म्हणून कधी वाटली नाही, म्हणून त्याला आपल्या कोणत्याही इष्ट वस्तुनिशी निभावून जाता येणार नाही. |
|
| 21 |
|
| त्याने ग्रासले नाही असे काही राहिले नाही, म्हणून त्याची समृद्धी टिकायची नाही. |
|
| 22 |
|
| आबादानीच्या काळातही त्याला अडचण पडेल; प्रत्येक कंगालाचे हात त्याच्यावर पडतील. |
|
| 23 |
|
| असे होईल की त्याच्या पोटाची भर करण्यास देव त्याच्यावर आपला क्रोधाग्नी पाखडील; आणि तो अन्न खात असता त्याच्या क्रोधवृष्टीचा प्रवेश त्याच्या पोटात होईल.1 |
|
| 24 |
|
| लोखंडी शस्त्रापासून तो निभावला तरी पितळी तीर त्याला विंधून टाकील. |
|
| 25 |
|
| तो तीर उपटून काढील, तो त्याच्या शरीरातून बाहेर येईल; चमकणारे टोक त्याच्या पित्ताशयातून बाहेर येईल; दहशती त्याच्यावर येतील. |
|
| 26 |
|
| त्याच्या निधीवर काळोख नेमला आहे; फुंकावा लागत नाही असा अग्नी त्याला ग्रासून टाकील; त्याच्या डेर्यात जे काही उरले असेल तेही तो स्वाहा करील; |
|
| 27 |
|
| आकाश त्याचा अधर्म प्रकट करील; पृथ्वी त्याच्याविरुद्ध उठेल. |
|
| 28 |
|
| त्याच्या घरातील संपदा चालती होईल; देवाच्या क्रोधदिनी ती धुऊन जाईल. |
|
| 29 |
|
| देवाकडून नेमलेला हा दुर्जनाचा वाटा आहे; देवाने ठरवलेले हे त्याचे वतन आहे.” |
|
|
|
|