|
| 1 |
|
| मग इय्योबाने उत्तर दिले: |
|
| 2 |
|
| “आज देखील माझे गार्हाणे कडू आहे; मी कण्हत असतानाही परमेश्वराचा हात माझ्यावर भारी आहे. |
|
| 3 |
|
| परमेश्वर कुठे आढळेल हे जर मला माहीत असते; मी जर त्यांच्या निवासस्थानापर्यंत जाऊ शकलो असतो! |
|
| 4 |
|
| तर माझा वाद मी त्यांच्यापुढे ठेवली असता माझी बाजू त्यांच्यापुढे सविस्तर मांडली असती. |
|
| 5 |
|
| ते मला काय उत्तर देतील हे मी बघेन, आणि त्यांचे म्हणणे मी स्वीकारेन. |
|
| 6 |
|
| मोठ्या जोमाने ते माझा विरोध करतील काय? नाही, ते नक्कीच मला दोष लावणार नाहीत. |
|
| 7 |
|
| सज्जन त्यांच्यासमोर आपली निर्दोषता सिद्ध करू शकतो, आणि माझ्या न्यायाधीशापासून सर्वकाळासाठी माझी सुटका होईल. |
|
| 8 |
|
| “परंतु मी जर पूर्वेकडे गेलो तर परमेश्वर तिथे नाही; आणि पश्चिमेकडे गेलो, तिथेही ते मला सापडत नाहीत. |
|
| 9 |
|
| जेव्हा ते उत्तरेकडे कार्यरत असतात, तरी मला ते दिसत नाहीत; जेव्हा ते दक्षिणेकडे वळतात, तेव्हा मला ते ओझरतेही दिसत नाहीत. |
|
| 10 |
|
| परंतु माझे मार्ग त्यांना अवगत आहेत; जेव्हा ते मला पारखतील, तेव्हा शुद्ध सोन्यासारखा मी प्रमाणित होईन. |
|
| 11 |
|
| माझ्या पावलांनी काळजीपूर्वक परमेश्वराच्या पावलांचे अनुसरण केले आहे; दुसरीकडे न वळता मी त्यांच्या मार्गावरच राहिलो आहे. |
|
| 12 |
|
| मी त्यांच्या मुखातील आज्ञांपासून अलिप्त झालो नाही; माझ्या दररोजच्या अन्नापेक्षा त्यांच्या तोंडचे शब्द मला मौल्यवान आहेत. |
|
| 13 |
|
| “परंतु ते अतुलनीय आहेत आणि त्यांचा विरोध करणारा कोण आहे? त्यांच्या मनास येईल तसेच ते करतात. |
|
| 14 |
|
| माझ्याविरुद्ध असलेला त्यांचा निवाडा ते पूर्णतेस नेतील, आणि अशा पुष्कळ योजना त्यांनी माझ्यासाठी राखून ठेवल्या आहेत. |
|
| 15 |
|
| म्हणून त्यांच्या समक्षतेत मला भय वाटते; जेव्हा या सर्वांचा मी विचार करतो, तेव्हा मला त्यांचा दरारा वाटतो. |
|
| 16 |
|
| परमेश्वराने माझे हृदय क्षीण केले आहे; सर्वसमर्थाने मला भीतीने जखडले आहे. |
|
| 17 |
|
| निबिड अंधकार माझे मुख झाकून टाकतो, परंतु तो मला गप्प करू शकला नाही. |
|
|
|
|