पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| मग ईयोबाने प्रत्युत्तर केले, |
| 2 |
| “तू निर्बळास केवढेसे साहाय्य केले? शक्तिहीन बाहूला तू कितीसा आधार दिलास? |
| 3 |
| बुद्धिहीनास कशी काय मसलत दिली? तू कितीसे मोठे ज्ञान प्रकट केलेस? |
| 4 |
| तू कोणापुढे हे शब्द बोललास? कोणाचे मनोगत तुझ्या तोंडून निघाले? |
| 5 |
| मृतांचे आत्मे जलनिधीच्या व जलचरांच्या खाली थरथरा कापत आहेत. |
| 6 |
| देवापुढे अधोलोक उघडा आहे; विनाशस्थान1 आच्छादित नाही. |
| 7 |
| त्याने उत्तरेकडील नभोमंडळ शून्य अवकाशावर पसरले आहे; त्याने पृथ्वी निराधार टांगली आहे. |
| 8 |
| तो पाणी मेघमंडळात कोंडून ठेवतो; मेघ त्याच्या भाराने भंग पावत नाहीत. |
| 9 |
| तो आपल्या सिंहासनापुढे आपले मेघ पसरून ते झाकून टाकतो; |
| 10 |
| प्रकाश व अंधकार ह्यांमधील हद्दीशी त्याने जलनिधीची सीमा भिडवली आहे. |
| 11 |
| त्याच्या धाकाने गगनस्तंभ थरथर कापतात व भयचकित होतात. |
| 12 |
| तो आपल्या सामर्थ्याने समुद्र शमवतो;2 तो आपल्या बुद्धिबलाने राहाब छिन्नभिन्न करतो; |
| 13 |
| त्याच्या नि:श्वासाने आकाशाची शोभा प्रकट होते; त्याच्या हाताने धावता राक्षसी सर्प विंधला आहे; |
| 14 |
| पाहा, ह्या त्याच्या कार्यक्षेत्राच्या केवळ सीमा आहेत; त्याची केवळ चाहूल आपल्या कानी येते; पण त्याच्या प्रभावाच्या गर्जनेचा अंत कोणाला लागेल?” |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/job/026.mp3
42
26