पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| नंतर इय्योबाने उत्तर देऊन म्हटले: |
| 2 |
| “तुम्ही दुर्बळाचे कसे साहाय्य केले! एखाद्या शक्ती नसलेल्या हाताला कसे संरक्षण दिले! |
| 3 |
| बुद्धिहीनाला तुम्ही काय सल्ला दिला! आणि कोणते प्रचंड अंतर्विचार तुम्ही सादर केले आहे! |
| 4 |
| असे शब्द बोलण्यास तुम्हाला कोणी साहाय्य केले? आणि कोणाचा आत्मा तुमच्या मुखाद्वारे बोलला आहे? |
| 5 |
| “जे मेलेले आहेत ते मोठ्या यातनांमध्ये आहेत, जे जलांमध्ये आणि जलांच्या खाली राहतात ते सुद्धा तसेच आहे. |
| 6 |
| मृतांचे जग परमेश्वरापुढे उघडे आहे; त्यांच्या दृष्टीपासून नाश लपलेला नाही. |
| 7 |
| परमेश्वर उत्तरेकडील नभोमंडळ मोकळ्या अंतरिक्षावर पसरवितात; आणि पृथ्वी निराधार टांगली आहे. |
| 8 |
| आपल्या घनदाट मेघांमध्ये ते जल कोंडून ठेवतात, तरीही त्यांच्या वजनाने आभाळ फाटत नाहीत. |
| 9 |
| त्यांनी आपले मेघ पसरवून, पौर्णिमेच्या चंद्राचे मुख झाकले आहे. |
| 10 |
| त्यांनी जलांवर क्षितिज नेमून ठेवले आहे प्रकाश व अंधकारासाठीही सीमा आखून दिल्या आहेत. |
| 11 |
| परमेश्वराच्या धमकावण्याने आकाशातील स्तंभ थरथरतात, त्यांच्या धाकाने ते भयचकित होतात. |
| 12 |
| आपल्या शक्तीने ते सागर घुसळून टाकतात; आणि आपल्या बुद्धीच्या बलाने राहाबाचे तुकडे तुकडे करतात. |
| 13 |
| केवळ त्यांच्या श्वासाने आकाशाला सौंदर्य लाभते; त्यांच्या हाताने वेगाने सळसळणार्या सर्पाला विंधले आहे. |
| 14 |
| परमेश्वर करतात त्यातील या तर केवळ किरकोळ गोष्टी आहेत; आम्ही मात्र त्यांचा कानोसा घेऊ शकतो! त्यांच्या सामर्थ्याचा गडगडाट कोण समजू शकणार?” |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/job/026.mp3
42
26