|
| 1 |
|
| इय्योब आपला वाद पुढे चालवून म्हणाला: |
|
| 2 |
|
| “ज्या परमेश्वराने मला न्याय देण्याचे नाकारले आहे, आणि ज्या सर्वसमर्थाने माझे जीवन कटुत्वाने भरले आहे, त्यांना स्मरून मी सांगतो, |
|
| 3 |
|
| की जोपर्यंत मी जिवंत आहे, आणि परमेश्वराचा श्वास माझ्या नाकपुड्यांत आहे, |
|
| 4 |
|
| तोपर्यंत माझे ओठ काहीच वाईट बोलणार नाहीत, आणि माझी जीभ असत्य उच्चारणार नाही. |
|
| 5 |
|
| मी कधीही मान्य करणार नाही की तुमचे म्हणणे बरोबर आहे; मी मरेपर्यंत, माझी प्रामाणिकता मी नाकारणार नाही. |
|
| 6 |
|
| माझी निर्दोषता मी कधीही सोडून देणार नाही; मी जिवंत आहे तोपर्यंत माझा विवेक मला दोष देणार नाही. |
|
| 7 |
|
| “माझे शत्रू दुष्टांप्रमाणे, आणि माझे विरोधी अन्यायीप्रमाणे होवोत! |
|
| 8 |
|
| कारण परमेश्वराने जर देवहीनाला छेदून टाकले, आणि त्याचा प्राण घेतला तर त्यांना काय आशा आहे? |
|
| 9 |
|
| जेव्हा त्यांच्यावर संकट येईल, तेव्हा परमेश्वर त्यांची आरोळी ऐकेल काय? |
|
| 10 |
|
| सर्वसमर्थामध्ये त्यांना संतोष मिळणार काय? सर्वदा ते परमेश्वराचा धावा करतील काय? |
|
| 11 |
|
| “परमेश्वराच्या सामर्थ्याविषयी मी तुम्हाला शिकवेन; सर्वसमर्थाचे मार्ग मी लपवणार नाही. |
|
| 12 |
|
| तुम्ही सर्वांनी स्वतः हे बघितले आहे, मग या निरर्थक गोष्टी का बोलता? |
|
| 13 |
|
| “दुष्टासाठी परमेश्वर जे नेमून देतात ते हेच आहे, कठोर मनुष्याला सर्वसमर्थाच्या हातून हाच वारसा मिळतो: |
|
| 14 |
|
| त्याला कितीही मुलेबाळे असली, तरी त्यांचा शेवट तलवारीने होणार; त्याच्या संततीस कधीही पुरेसे अन्न मिळणार नाही. |
|
| 15 |
|
| आणि त्यातून जे वाचतील, ते रोगाला बळी पडतील, आणि त्यांच्या विधवादेखील त्यांच्यासाठी शोक करणार नाहीत. |
|
| 16 |
|
| दुर्जन धुळीसारखा धनाचा साठा करतो व चिखलाप्रमाणे वस्त्र गोळा करून ठेवतो, |
|
| 17 |
|
| जे काही तो साठवून ठेवतो, तरी न्यायी ती वस्त्रे पांघरतील, आणि निरपराधी त्याचे रुपे आपसात वाटून घेतील. |
|
| 18 |
|
| त्याने बांधलेले घर पतंगाच्या कोशाप्रमाणे आहे, पहारेकर्याच्या झोपडीप्रमाणे ते आहे. |
|
| 19 |
|
| धनवान व्यक्ती म्हणून तो रात्री झोपी जातो; पण सकाळी उठून पाहिले तेव्हा काही उरलेले नसते. |
|
| 20 |
|
| संकटे पुराप्रमाणे त्याला गाठतात; रात्रीचे तुफान त्याच्यापासून सर्वकाही हिसकावून घेते. |
|
| 21 |
|
| पूर्वेचा वारा त्याला वाहून घेऊन जातो आणि तो नाहीसा होतो; त्याच्या स्थानातून तो उडवून टाकला जातो. |
|
| 22 |
|
| तो त्याच्या सामर्थ्यापासून पळ काढण्याचा बेत करतो तरी त्याच्यावर दया न होता तो दूर फेकला जाईल. |
|
| 23 |
|
| टाळ्या वाजवित पूर्वेचा वारा त्याची निंदा करेल आणि तिरस्काराने आपल्या ठिकाणातून तो हुसकून टाकला जाईल.” |
|
|
|
|