|
| 1 |
|
| मग त्या तिघांनी इय्योबाला उत्तर देण्याचे थांबविले, कारण आपल्या दृष्टीने तो स्वतः नीतिमान होता. |
|
| 2 |
|
| परंतु रामाच्या कुळातील, बारकाएल बूजीचा पुत्र एलीहू खूप रागावला, कारण इय्योब परमेश्वरापेक्षा स्वतःलाच न्यायी ठरवीत होता. |
|
| 3 |
|
| तीन मित्रांवर देखील तो संतापला कारण त्यांनी कोणत्याही प्रकारे इय्योबाचे खंडन केले नाही आणि तरीसुद्धा त्यांनी परमेश्वराला दोषी ठरविले होते. |
|
| 4 |
|
| एलीहू आता इय्योबाशी बोलायचा थांबला होता, कारण ते त्याच्याहून वयाने मोठे होते. |
|
| 5 |
|
| परंतु जेव्हा एलीहूने पाहिले की आणखी बोलण्यास त्यांच्याजवळ काहीही उरले नाही, त्याचा राग भडकला. |
|
| 6 |
|
| आणि बूजी बारकाएलचा पुत्र एलीहू बोलला: “मी वयाने लहान आहे, व आपण वयोवृद्ध आहात; म्हणूनच मी घाबरलो, आणि मला जे माहीत आहे ते सांगण्याचे धाडस केले नाही; |
|
| 7 |
|
| मला वाटले की, ‘वयाने मोठे असलेल्यांनी बोलावे; प्रौढ असलेल्यांनी ज्ञान शिकवावे.’ |
|
| 8 |
|
| परंतु व्यक्तीमध्ये असलेला तो आत्मा, आणि सर्वसमर्थाचा श्वासच आहे की जो शहाणपण देतो. |
|
| 9 |
|
| जे वयाने मोठे तेच ज्ञानी आहेत असे नसते, जे योग्य ते केवळ वृद्धांनाच समजते असेही नाही. |
|
| 10 |
|
| “म्हणून मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐका; मी सुद्धा मला जे माहीत आहे ते सांगतो. |
|
| 11 |
|
| तुम्ही बोलत असता, मी प्रतीक्षा करीत बसलो, जेव्हा तुम्हाला शब्द अपुरे पडत होते; तेव्हा तुमचे ते तर्कवाद मी ऐकले, |
|
| 12 |
|
| लक्षपूर्वक मी तुमचे ऐकले. परंतु तुमच्यातील एकानेही इय्योबाला चुकीचे असे सिध्द केले नाही; तुमच्यापैकी कोणीही त्याच्या वादास प्रत्युत्तर केले नाही. |
|
| 13 |
|
| ‘आम्हाला ज्ञान सापडले आहे’ असे म्हणू नका; ‘परमेश्वराने त्याचे खंडन करावे, मनुष्याने नव्हे.’ |
|
| 14 |
|
| परंतु इय्योबाने माझ्याविरुद्ध शब्द लढवले नाहीत, आणि तुमच्या वादांच्या साहाय्याने मी त्याला उत्तर देणार नाही. |
|
| 15 |
|
| “ते निराश झाले आहेत आणि त्यांच्याकडे बोलण्यासाठी आणखी काही उरले नाही; ते शब्दरहित झाले आहेत. |
|
| 16 |
|
| आता ते तिथे गप्प उभे आहेत, ते शांत आहेत म्हणून ते बोलतील याची मी वाट का पाहावी? |
|
| 17 |
|
| मी देखील माझे म्हणणे सादर करेन; मला जे माहीत आहे ते मी सुध्दा सांगेन. |
|
| 18 |
|
| कारण माझ्याकडे भरपूर शब्द आहेत, आणि माझ्या आत माझा आत्मा मला बोलावयास भाग पाडत आहे; |
|
| 19 |
|
| बाटलीमध्ये भरून ठेवलेल्या द्राक्षारसा समान, नवीन बुधला जो फुटायला आला आहे, त्यासारखा मी झालो आहे. |
|
| 20 |
|
| मला आराम मिळावा म्हणून मी बोलणारच; उत्तर देण्यासाठी मी माझे मुख उघडलेच पाहिजे. |
|
| 21 |
|
| मी पक्षपात करणार नाही, ना मी कोणा मनुष्याची उगीच प्रशंसा करणार; |
|
| 22 |
|
| कारण मी जर कोणाची फाजील स्तुती करण्यात तरबेज असलो, तर माझा निर्माणकर्ता मला लवकरच घेऊन जाईल. |
|
|
|
|