|
| 1 |
|
| तर आता हे ईयोबा, माझे भाषण श्रवण कर. माझे सगळे बोलणे ऐकून घे. |
|
| 2 |
|
| पाहा, आता मी आपले तोंड उघडले आहे; माझी जीभ माझ्या तोंडात हलू लागली आहे. |
|
| 3 |
|
| माझ्या मनातले विचार जसेच्या तसे माझ्या शब्दांनी प्रकट होणार; माझ्या वाचेने प्रकट होणारे ज्ञान माझ्या तोंडून निष्कपटपणे निघणार. |
|
| 4 |
|
| देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे, सर्वसमर्थाच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झाले आहे. |
|
| 5 |
|
| तुला उत्तर देता येईल तर दे; सिद्ध हो, माझ्यापुढे उभा राहा. |
|
| 6 |
|
| पाहा, देवापुढे मी तुझ्यासारखाच आहे; मीही मातीच्या गोळ्याचा घडलेला आहे. |
|
| 7 |
|
| माझ्या धाकाने तुला घाबरायला नको; माझा दाब तुला भारी होणार नाही. |
|
| 8 |
|
| तुझे बोलणे माझ्या कानी पडले, तुझे शब्द मी ऐकले, ते हे: |
|
| 9 |
|
| ‘मी शुद्ध आहे, मी निरपराध आहे; मी निष्कलंक आहे, मी निर्दोष आहे; |
|
| 10 |
|
| पाहा, देव कसा माझ्याविरुद्ध निमित्त शोधतो; तो मला शत्रू गणतो; |
|
| 11 |
|
| तो माझे पाय खोड्यात घालतो; तो माझ्या सगळ्या चालचालणुकीवर नजर ठेवतो.’ |
|
| 12 |
|
| पाहा, मी तुला ह्याचे उत्तर देतो; हे तुझे बोलणे यथार्थ नाही; कारण देव मानवाहून थोर आहे. |
|
| 13 |
|
| ‘तो आपल्या कोणत्याही करणीचे कारण सांगत नाही,’ म्हणून का तू त्याच्याशी वाद घालतोस? |
|
| 14 |
|
| देव एका प्रकारे नव्हे तर दोन प्रकारे मनुष्याशी बोलतो; पण तो त्याकडे चित्त देत नाही. |
|
| 15 |
|
| स्वप्नस्थितीत, रात्रीच्या दृष्टान्तात मनुष्य गाढ निद्रेत असता, तो बिछान्यावर पडून झोप घेत असता, |
|
| 16 |
|
| देव त्याचे कान उघडतो; त्याला प्राप्त झालेल्या बोधावर तो मुद्रा करतो. |
|
| 17 |
|
| तेणेकरून तो मनुष्याच्या कृतीला आळा घालतो, पुरुषाच्या गर्वाचा परिहार करतो; |
|
| 18 |
|
| तो त्याचा जीव गर्तेपासून राखतो. शस्त्राने होणार्या नाशापासून त्याचा जीव वाचवतो. |
|
| 19 |
|
| कोणाला अशी शिक्षा होते की तो क्लेश भोगत बिछान्यावर लोळत राहतो; त्याच्या हाडांची एकसारखी तडफड चालते; |
|
| 20 |
|
| त्याचा जीव अन्नाला कंटाळतो, त्याच्या मनाला मिष्टान्नाचा तिटकारा येतो. |
|
| 21 |
|
| त्याचा देह गळून तो दिसतो न दिसतोसा होतो; त्याची हाडे पूर्वी दिसत नसत, ती बाहेर येतात. |
|
| 22 |
|
| शेवटी तो गर्तेजवळ जाऊन ठेपतो, त्याचे जीवन नाश करणार्यांच्या तावडीत जाते. |
|
| 23 |
|
| मनुष्याला सन्मार्ग दाखवणारा हजारांत एक असा कोणी मध्यस्थ दिव्यदूत त्याला आढळला, |
|
| 24 |
|
| तर देव त्याच्यावर प्रसन्न होऊन म्हणेल, ‘ह्याचा बचाव कर, ह्याला गर्तेत पडू देऊ नकोस; मला खंड मिळाला आहे.’ |
|
| 25 |
|
| मग त्याचे शरीर बालकाच्या शरीरापेक्षा टवटवीत होते; त्याचे तारुण्याचे दिवस त्याला पुन्हा प्राप्त होतात. |
|
| 26 |
|
| तो देवाची प्रार्थना करतो, आणि तो त्याच्यावर प्रसन्न होतो; तो आनंदाने त्याचे दर्शन घेतो; देव त्याची निर्दोषता पूर्ववत स्थापित करतो. |
|
| 27 |
|
| तो गाणी गाऊन लोकांना म्हणतो, ‘मी पाप केले होते; मी सरळ मार्ग सोडून वाकड्या मार्गाने चाललो होतो, त्याचे प्रायश्चित्त मला मिळाले नाही; |
|
| 28 |
|
| त्याने माझा जीव राखला, मला गर्तेत पडू दिले नाही, माझ्या जिवाला प्रकाश लाभला आहे.’ |
|
| 29 |
|
| पाहा, हे सर्व देव मनुष्याला दोनतीनदा करतो; |
|
| 30 |
|
| असा तो त्याचा जीव गर्तेपासून वाचवतो, म्हणजे तो जीवनप्रकाशाने प्रकाशित होतो. |
|
| 31 |
|
| हे ईयोबा, कान देऊन माझे ऐक; उगा राहा, मला बोलू दे. |
|
| 32 |
|
| तुला काही उत्तर द्यायचे असेल तर ते दे; बोल, कारण तुला निर्दोष ठरवायची माझी इच्छा आहे. |
|
| 33 |
|
| नाहीतर माझे ऐक; उगा राहा, मी तुला ज्ञान सांगतो.” |
|
|
|
|