|
| 1 |
|
| मग याहवेह वादळातून इय्योबाशी बोलले, ते म्हणाले: |
|
| 2 |
|
| “हा कोण आहे जो अज्ञानी शब्दांनी माझ्या योजना अस्पष्ट करतो? |
|
| 3 |
|
| पुरुषाप्रमाणे आपली कंबर कसून घे; मी तुला प्रश्न विचारेन, आणि तू मला उत्तर देशील. |
|
| 4 |
|
| “मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कुठे होतास? तुला समजत असेल तर सांग. |
|
| 5 |
|
| तिचे आकारमान कोणी आखले? खचित तुला ठाऊक असणार! तिच्यावर मापनसूत्र कोणी ताणले? |
|
| 6 |
|
| तिचे पाये कशावर रोवले आहे, किंवा तिची कोनशिला कोणी बसवली— |
|
| 7 |
|
| जेव्हा प्रभात तार्यांनी एकत्र गाणी गाईली आणि सर्व देवदूतांनी हर्षनाद केला तेव्हा तू कुठे होता? |
|
| 8 |
|
| “सागर जसा गर्भातून उफाळून समोर आला तेव्हा त्याला दारांच्या मागे कोणी अडविले, |
|
| 9 |
|
| जेव्हा मी ढगांसाठी वस्त्र बनविली आणि त्यांना दाट अंधकारात लपेटले, |
|
| 10 |
|
| जेव्हा त्याच्या मर्यादा मी निश्चित केल्या आणि त्यांची दारे आणि गजे त्यांच्या ठिकाणी लावून दिली, |
|
| 11 |
|
| जेव्हा मी म्हणालो, ‘तुम्ही येथवरच यावे आणि यापलीकडे नाही; तुझ्या उन्मत्त लाटा येथेच थांबतील’? |
|
| 12 |
|
| “तू कधी तरी पहाटेला आदेश दिला आहे का, किंवा कधी प्रभातेला त्याचे ठिकाण दाखविले आहे, |
|
| 13 |
|
| यासाठी की ते पृथ्वीच्या टोकांना पकडतील आणि दुष्टांना त्यातून झटकून टाकतील? |
|
| 14 |
|
| जशी शिक्क्याच्या खाली ओली माती, तशी पृथ्वी आकार घेते; आणि वस्त्रासारखी त्याची मुद्रा उठून दिसते. |
|
| 15 |
|
| दुष्टांपासून त्यांचा प्रकाश मागे रोखला जातो, आणि त्यांचा उगारलेला हात मोडला जातो. |
|
| 16 |
|
| “समुद्राच्या उगम स्थानांपर्यंत तू कधी प्रवास केला काय किंवा त्याच्या खोल गर्तेमध्ये कधी चालत गेलास काय? |
|
| 17 |
|
| मृत्यूची द्वारे तुला दाखविली गेली आहेत काय? अति खोल अंधकाराचे दरवाजे तू पाहिलेस काय? |
|
| 18 |
|
| पृथ्वीचा विस्तार केवढा आहे याचे आकलन तुला झाले आहे का, हे सर्व जर तू जाणतोस तर मला सांग. |
|
| 19 |
|
| “प्रकाशाच्या निवासस्थानाकडे नेणारी वाट कोणती आहे? आणि अंधार कुठे वस्ती करतो? |
|
| 20 |
|
| त्यांच्या ठिकाणांपर्यंत त्यांना तू घेऊन जाशील काय? त्यांच्या घराच्या वाटा तुला माहीत आहेत काय? |
|
| 21 |
|
| तुला हे नक्कीच माहीत असणार, कारण तेव्हा तर तू जन्मला होता! तू तर पुष्कळ वर्षे जगला आहेस! |
|
| 22 |
|
| “हिमाच्या कोठारांमध्ये तू प्रवेश केलास काय किंवा गारांची भांडारे तू पाहिलीस काय? |
|
| 23 |
|
| जी मी संकट काळासाठी, लढाई आणि युद्धाच्या दिवसांसाठी राखून ठेवतो? |
|
| 24 |
|
| आकाशात चमकणारी वीज कुठून पांगवली जाते, किंवा जिथून पूर्वेचा वारा पृथ्वीवर विखुरला जातो, त्याचा मार्ग कुठे आहे? |
|
| 25 |
|
| मुसळधार पावसासाठी प्रवाह, आणि वादळी पावसाची वाट कोण खणतात, |
|
| 26 |
|
| म्हणजे ज्या भूमीवर कोणीही लोक राहत नाहीत, निर्जन वाळवंटामध्ये पाणी पुरवठा करू शकेल, |
|
| 27 |
|
| यासाठी की ते ओसाड उजाड भूमीला तृप्त करेल व तिथे गवत उगवू शकेल? |
|
| 28 |
|
| पावसाला पिता आहे का? दहिवराच्या थेंबांचा पिता कोण आहे? |
|
| 29 |
|
| बर्फ कोणाच्या उदरातून येते? आकाशातील गारठ्याला कोण जन्म देते |
|
| 30 |
|
| जेव्हा पाणी दगडासारखे घट्ट होते, जेव्हा खोल सागराचा पृष्ठभाग गोठून जातो? |
|
| 31 |
|
| “कृत्तिकापुंजाचे सौंदर्य तू बांधू शकतो काय? मृगशीर्षाचे बंध तुझ्याने सोडवतील काय? |
|
| 32 |
|
| तू त्यांच्या ॠतूनुसार नक्षत्रांचे समूह उगवतीस आणू शकतो काय सप्तॠषीला व त्याच्या उपग्रहांना चालवशील काय? |
|
| 33 |
|
| स्वर्गाचे नियम तुला माहिती आहेत काय? परमेश्वराची सत्ता तू पृथ्वीवर स्थापित करू शकतो काय? |
|
| 34 |
|
| “ढगांपर्यंत तुझा आवाज तुला उंचाविता येईल काय पुराच्या पाण्याने स्वतःला झाकता येईल काय? |
|
| 35 |
|
| आकाशातील विजेला कोसळण्यापासून तू थांबवू शकतो काय? ‘आम्ही इथे आहोत’ असे निवेदन ते तुला देतात काय? |
|
| 36 |
|
| पाणपक्ष्याला ज्ञान कोण देते, किंवा कोंबड्याला समज कोणी दिला? |
|
| 37 |
|
| मेघांची गणना करण्याचे बुद्धिसामर्थ्य कोणाजवळ आहे? जेव्हा माती कडक होते, आणि जमिनीची ढेकळे एकत्र चिकटतात? तेव्हा आकाशातील बुधले कोणाला ओतता येतील? |
|
| 38 |
|
|
|
| 39 |
|
| “सिंहिणीसाठी तू शिकार करतो का? तरुण सिंहांची भूक तू शमवतोस का? |
|
| 40 |
|
| ज्यावेळी सिंह त्यांच्या गुहांमध्ये दबा धरून असतात किंवा दाट झाडीमध्ये वाट बघत असतात? |
|
| 41 |
|
| कावळ्यांना अन्न कोण पुरवितो जेव्हा त्यांची पिल्ले भुकेने परमेश्वराकडे आरोळी मारतात आणि अन्नाअभावी चोहीकडे फिरतात? |
|
|
|
|