|
| 1 |
|
| पहाडी रानशेळ्या विण्याचा काळ तुला ठाऊक आहे काय? हरिणी केव्हा प्रसवतात हे तुला कळते काय? |
|
| 2 |
|
| त्यांचे महिने केव्हा भरतात ह्याचे गणित तुला करता येते काय? त्यांचा प्रसवकाळ तुला कळतो काय? |
|
| 3 |
|
| त्या ओणवून आपली पिले वितात; त्या प्रसूतिवेदनांपासून मुक्त होतात. |
|
| 4 |
|
| त्यांची पिले धष्टपुष्ट होऊन रानात वाढतात; ती त्यांना सोडून जातात, त्यांच्याकडे परत येत नाहीत. |
|
| 5 |
|
| रानगाढवाला कोणी स्वैर फिरू दिले? त्याला बंधमुक्त कोणी केले? |
|
| 6 |
|
| त्याचे निवासस्थान मी रुक्ष मैदानातील क्षारभूमी केले आहे. |
|
| 7 |
|
| नगरातील गजबजीचा त्याला तिटकारा असतो; हाकणार्याचा शब्द त्याच्या कानी पडत नाही. |
|
| 8 |
|
| डोंगरावर जे काही सापडेल ते त्याचा चारा; तो हरतर्हेची हिरवळ शोधत फिरतो. |
|
| 9 |
|
| रानबैल तुझी सेवा करण्यास मान्य होईल काय? तो रात्रीचा गव्हाणीत राहील काय? |
|
| 10 |
|
| त्याच्या गळ्यात जुंपणी बांधून त्याला शेताच्या तासात तू चालवशील काय? तो तुझ्यामागून खोर्यातील जमीन कोळपील काय? |
|
| 11 |
|
| त्याचे बळ मोठे आहे म्हणून तू त्याच्यावर भिस्त ठेवशील काय? अथवा त्याच्यावर आपले काम सोपवशील काय? |
|
| 12 |
|
| तो तुझे धान्य घरी आणील व तुझ्या खळ्यातले धान्य जमा करील असा त्याचा तुला भरवसा आहे काय? |
|
| 13 |
|
| शहामृगीचे पंख आनंदाने फडफडतात; तिचे पिसारे व पर माया करण्याच्या कामी पडतात काय? |
|
| 14 |
|
| ती आपली अंडी जमिनीच्या हवाली करते, ती धुळीत उबवते. |
|
| 15 |
|
| ती कोणाच्या पायाखाली चिरडतील, किंवा कोणी वनपशू ती तुडवील, ह्याचे तिला भान नसते. |
|
| 16 |
|
| ती आपल्या पिलांशी अशी निर्दयतेने वागते की जशी काय ती तिची नव्हतच; आपले श्रम निष्फळ झाले तरी ती निश्चिंत राहते; |
|
| 17 |
|
| कारण देवाने तिला बुद्धिहीन असे उत्पन्न केले आहे; तिच्या वाट्याला अक्कल आली नाही. |
|
| 18 |
|
| ती आपली मान उंच उभारून आपले पंख फडफडवत धावते, तेव्हा ती घोड्याला व स्वाराला हसते. |
|
| 19 |
|
| घोड्याला बळ तू देतोस काय? त्याच्या मानेवर हलणार्या आयाळीचे पांघरूण तू घालतोस काय? |
|
| 20 |
|
| त्याला पोळाप्रमाणे उड्या मारण्यास तू लावतोस काय? त्याच्या फुरफुरण्याचा तोरा भयंकर असतो. |
|
| 21 |
|
| तो मैदानात टापा मारतो, तो आपल्या बलाचा अभिमान मिरवतो, तो हत्यारबंद शिपायांशी सामना करण्यास पुढे सरसावतो. |
|
| 22 |
|
| तो भीतीस हसतो, व घाबरत नाही, तलवारीपासून मागे हटत नाही. |
|
| 23 |
|
| भाता, चमकणारा भाला व बरची ही त्याच्यावर आपटून खणखणतात. |
|
| 24 |
|
| तो उग्रतेने व क्रोधाने जमीन तोडून जातो; रणशिंगाचा नाद ऐकताच तो अनावर होतो. |
|
| 25 |
|
| रणशिंग जेव्हाजेव्हा वाजते तेव्हा तो ‘अहा!’ म्हणतो; लढाई, सरदारांची गर्जना व रणशब्द ह्यांचा वास तो दुरून काढतो. |
|
| 26 |
|
| ससाणा तुझ्या चातुर्याने उडतो आणि दक्षिणेकडे उडून जाण्यास तो पंख फडफडवतो काय? |
|
| 27 |
|
| गरुड तुझ्या आज्ञेने भरारी मारतो व उंच ठिकाणी घरटे करतो काय? |
|
| 28 |
|
| तो खडकात वस्ती करतो, खडकाच्या सुळक्यावर दुर्गम स्थानी आपले कोटे करतो. |
|
| 29 |
|
| तेथून तो आपले भक्ष्य निरखतो; त्याच्या नेत्रांना ते दूरवर दिसते. |
|
| 30 |
|
| त्याची पिले रक्त चाखतात; जेथे वध पावलेले असतात तेथे तो असतो.” |
|
|
|
|