|
| 1 |
|
| “रानशेळ्या कधी प्रसवितात हे तू जाणतो काय? हरिणी आपल्या पाडसाला जन्म देताना तू पाहतो का? |
|
| 2 |
|
| प्रसवे पर्यंत त्यांचे महिने तू मोजतो काय? त्यांचा प्रसविण्याचा समय तुला कळतो काय? |
|
| 3 |
|
| त्या ओणवतात आणि आपल्या पिलांना प्रसवितात; व त्यांच्या प्रसूती वेदना संपतात. |
|
| 4 |
|
| त्यांच्या पिल्लांची भरभराट होते व मोकळ्या रानात ते जोमाने वाढतात; ते सोडून जातात व परत येत नाहीत. |
|
| 5 |
|
| “रानगाढवांना कोणी मोकळे सोडून दिले? त्यांचे दोर कोणी सोडले? |
|
| 6 |
|
| मीच त्यांना रान त्यांचे घर म्हणून दिले आहे, आणि क्षारभूमी त्यांचे वसतिस्थान म्हणून दिले आहे. |
|
| 7 |
|
| नगरातील गोंधळाला ते हसतात; चालकाची ओरड त्याला ऐकू येत नाही. |
|
| 8 |
|
| टेकड्यांवर कुरणासाठी ते रांगा धरतात आणि जे काही हिरवेगार ते शोधत असतात. |
|
| 9 |
|
| “रानबैल तुझी सेवा करण्यासाठी संमती देईल काय? रात्रीच्या वेळी तो तुझ्या गोठ्यात राहील काय? |
|
| 10 |
|
| त्याला जुंपणीने बांधून तुला नांगरणी करता येईल काय? तुझ्यामागे जमिनीची मशागत तो करेल काय? |
|
| 11 |
|
| त्याच्या मोठ्या बलावर तू अवलंबून राहशील काय? तुझी जड कामे तू त्याच्यावर सोडशील काय? |
|
| 12 |
|
| खळ्यातून तुझे धान्य खेचून घेऊन ते तुझ्या मळणीपर्यंत तो ते आणेल असा तू त्याच्यावर विश्वास ठेवशील काय? |
|
| 13 |
|
| “जरी करकोचाच्या पंखांशी आणि पिसार्याशी त्यांची तुलना करता येत नाही तरी शहामृगाचे पंख आनंदाने फडफडतात. |
|
| 14 |
|
| ती धुळीत आपली अंडी देते आणि वाळूमध्ये ती उबविते, |
|
| 15 |
|
| एखाद्याच्या पायाखाली ती चिरडली जातील, किंवा कोणी वन्यपशू त्याला तुडवतील हे ती लक्षात घेत नाही. |
|
| 16 |
|
| ती आपल्या पिलांना कठोरतेने वागवते, जसे काय ते तिचे नाहीत; तिच्या प्रसूती वेदना व्यर्थ गेल्या याचे तिला काहीच वाटत नाही, |
|
| 17 |
|
| कारण परमेश्वराने तिला ज्ञान बहाल केले नाही किंवा तिला समजूतदारपणाचा वाटा दिला नाही. |
|
| 18 |
|
| परंतु जेव्हा ती धावण्यासाठी आपले पंख पसरते, तेव्हा ती घोडा व त्याच्या स्वाराकडे बघून हसते. |
|
| 19 |
|
| “घोड्याला त्याचे बळ तू देतोस काय अथवा त्याच्या मानेवर आयाळ तू पांघरलेस काय? |
|
| 20 |
|
| टोळाप्रमाणे त्याला तू उड्या मारण्यास लावतोस काय? जे त्यांच्या गर्विष्ठपणात आतंक व्यक्त करतात? |
|
| 21 |
|
| ते यांच्या भयंकर पंजाने ओरखडत आपल्या बळात उल्हास करतो, आणि शत्रूशी सामना करण्यासाठी धावून येतो. |
|
| 22 |
|
| तो भयास हसतो आणि कशालाही घाबरत नाही; तलवारीपासून तो मागे हटत नाही. |
|
| 23 |
|
| त्याच्या पाठीवर असलेला भाता; व त्याच्याबरोबर ठेवलेला चमकणारा भाला व बरची खणखणत असते. |
|
| 24 |
|
| तो बेभान आवेशात भूमी गिळंकृत करतो; रणशिंगाच्या गर्जनेने तो स्तब्ध उभा राहू शकत नाही. |
|
| 25 |
|
| तुतारीच्या नादाला तो ‘वाह!’ असे ओरडतो, दुरूनच तो लढाईचा वास घेतो, मग ती सेनापतीची ओरड असो किंवा रणगर्जना. |
|
| 26 |
|
| “बहिरी ससाणा उंच उडतो, आणि आपले पंख दक्षिणेकडे पसरतो, ते तो तुझ्या ज्ञानाने करतो काय? |
|
| 27 |
|
| तुझ्या आज्ञेनेच गरुड उंच भरार्या मारत आणि आपले घरटे उंचावर बांधतात काय? |
|
| 28 |
|
| तो उंच कडांवर वसतो आणि रात्री तिथेच राहतो; खडकाळ सुळका त्याचा भक्कम किल्ला आहे. |
|
| 29 |
|
| तिथूनच तो आपले भक्ष्य शोधतो; त्याच्या नेत्रास ते दुरूनच दिसते. |
|
| 30 |
|
| तिची पिल्ले रक्त पिऊन मेजवानी करतात. आणि जिथे मेलेले असतात, तिथे ती असतात.” |
|
|
|
|