|
| 1 |
|
| याहवेहने इय्योबास पुढे म्हटले, |
|
| 2 |
|
| “जो सर्वसमर्थाशी वाद घालतो, तो त्यांना सुधारणार का? जो परमेश्वरावर आरोप करतो, त्याने परमेश्वराला उत्तर द्यावे!” |
|
| 3 |
|
| तेव्हा इय्योब याहवेहला म्हणाला: |
|
| 4 |
|
| “मी अयोग्य आहे; मी तुम्हाला काय उत्तर देणार? मी माझा हात माझ्या मुखावर ठेवतो. |
|
| 5 |
|
| मी एकदा बोललो, पण माझ्याकडे उत्तर नाही; दोनदा मी बोललो, पण मी पुन्हा बोलणार नाही.” |
|
| 6 |
|
| मग याहवेह वादळातून इय्योबाशी बोलले: |
|
| 7 |
|
| “पुरुषासारखी आपली कंबर कस; मी तुला प्रश्न विचारतो, आणि तू मला त्याचे उत्तर देशील. |
|
| 8 |
|
| “माझ्या न्याया विषयी तू संशय धरशील काय? स्वतःचे समर्थन करावे म्हणून तू मला दोष लावशील काय? |
|
| 9 |
|
| तुझा बाहू परमेश्वरासारखा आहे काय, तुझा आवाज त्यांच्यासारखा गडगडाट करू शकतो काय? |
|
| 10 |
|
| मग गौरव आणि वैभव यांनी स्वतःला सुशोभित कर, आणि सन्मान व ऐश्वर्य ही परिधान कर. |
|
| 11 |
|
| तू आपल्या क्रोधाचा त्वेष मोकळा सोडून दे, आणि प्रत्येक गर्विष्ठाकडे पाहा व त्यांना खाली वाकव, |
|
| 12 |
|
| जे अहंकारी आहेत त्या सर्वांकडे पाहा आणि त्यांना नम्र कर. दुष्ट जिथे उभे राहतात, तिथेच त्यांना पायाखाली तुडव. |
|
| 13 |
|
| त्या सर्वांना मातीत एकत्रच गाडून टाक; कबरेमध्ये त्यांची तोंडे कफनवस्त्रांनी झाकून टाक. |
|
| 14 |
|
| मग मी स्वतः हे मान्य करेन की तुझाच उजवा हात तुला वाचवू शकतो. |
|
| 15 |
|
| “बेहेमोथ कडे पाहा, तुझ्याबरोबर मी त्यालाही घडविले. तो बैलाप्रमाणे गवत खातो. |
|
| 16 |
|
| त्याच्या कमरेत किती शक्ती आहे, आणि त्याच्या पोटाचे स्नायू किती बळकट आहेत! |
|
| 17 |
|
| गंधसरूप्रमाणे त्याचे शेपूट झोकांडत असते. त्याच्या मांड्यांच्या हाडांचे स्नायू एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. |
|
| 18 |
|
| त्याची हाडे कास्याच्या नळ्यासमान आहेत; त्याचे अवयव पोलादी गजासारखे आहेत. |
|
| 19 |
|
| परमेश्वराच्या कृत्यांमध्ये तो प्रथम क्रमांकावर आहे, तरीही त्याचा उत्पन्नकर्ता त्याच्याजवळ तलवार घेऊनच जातो. |
|
| 20 |
|
| डोंगर आपले उत्तम उत्पादन त्याला पुरवितात; आणि सर्व वनपशू त्याच्याभोवती खेळतात. |
|
| 21 |
|
| कमलिनीखाली तो पडून राहतो, लव्हाळ्याच्या बेटात व दलदलीत तो लपून असतो. |
|
| 22 |
|
| कमलिनी आपल्या छायेत त्याला झाकतात; ओढ्याच्या सभोवतीची उंच वाळुंजे त्याला वेढून घेतात. |
|
| 23 |
|
| उफळत्या नदीचे प्रवाह त्याला हानी करत नाही; यार्देनेचा ओघ त्याच्या तोंडावर वेगाने आला तरी तो सुरक्षित असतो. |
|
| 24 |
|
| उघड्या डोळ्यांनी कोणी त्याला धरेल काय, किंवा त्याला जाळ्यात अडकवून त्याचे नाक टोचतील काय? |
|
|
|
|