|
| 1 |
|
| “लिव्याथानास1 गळ घालून तुला ओढता येईल काय? दोरीने त्याची जीभ तुला दाबून धरता येईल काय? |
|
| 2 |
|
| त्याच्या नाकात लव्हाळ्याची वेसण तुला घालता येईल काय? त्याच्या जबड्यात गळ रोवता येईल काय? |
|
| 3 |
|
| तो तुझे आर्जव करीत राहील काय? तो तुला लाडीगोडी लावील काय? |
|
| 4 |
|
| मी तुझा सतत दास होऊन राहीन, अशी आणभाक तो तुझ्याशी करील काय? |
|
| 5 |
|
| लहान पक्ष्याशी खेळतात तसा तू त्याच्याशी खेळशील काय? त्याला बांधून तुझ्या कुमारीस तो खेळायला देशील काय? |
|
| 6 |
|
| धीवरांचे संघ त्याचा व्यापार करतील काय? त्याला विभागून ते व्यापार्यांना2 देतील काय? |
|
| 7 |
|
| त्याच्या कातडीत तू शूळ रोवशील काय? मासे मारण्याच्या बरच्या त्याच्या डोक्यात खुपसशील काय? |
|
| 8 |
|
| तू त्याला हात लावून तर पाहा, ह्या झटापटीची आठवण तुला पक्की राहील; आणि पुन्हा तू तसे करणार नाहीस. |
|
| 9 |
|
| पाहा, त्याला धरू पाहणार्याची आशा निष्फळ होते; त्याला पाहूनच एखादा गांगरून जाणार नाही काय? |
|
| 10 |
|
| त्याला चिडवण्याचे धाडस कोणी करणार नाही; तर मग माझ्यासमोर टिकेल असा कोण आहे? |
|
| 11 |
|
| मला कोणी प्रथम काही दिले आहे काय की मी त्याची फेड करू? अखिल नभोमंडळाखाली जे काही आहे ते माझे आहे. |
|
| 12 |
|
| त्याचे अवयव, त्याचे महाबल, त्याचा सुंदर बांधा ह्यांविषयी बोलायचा मी राहणार नाही. |
|
| 13 |
|
| त्याचे वरले आवरण कोणाला काढून घेता येईल? त्याच्या दाढांत कोणाला शिरकाव करता येईल? |
|
| 14 |
|
| त्याच्या तोंडाची कवाडे कोणाला उघडता येतील? त्याचे दात चोहोकडून विक्राळ आहेत; |
|
| 15 |
|
| त्याच्या खवल्याच्या रांगांचा त्याला अभिमान वाटतो; ती जशी काय परस्परांना जखडून टाकली आहेत. |
|
| 16 |
|
| ती एकमेकांशी जडलेली आहेत; त्यांच्यामधून हवेचा प्रवेश होत नाही. |
|
| 17 |
|
| ती एकमेकांशी जुळलेली व चिकटलेली आहेत; ती सुटी करता येत नाहीत. |
|
| 18 |
|
| तो शिंकला म्हणजे प्रकाश चमकतो; त्याचे डोळे प्रभातनेत्रांसारखे आहेत. |
|
| 19 |
|
| त्याच्या तोंडातून ज्वाळा निघतात, अग्नीच्या ठिणग्या उडतात. |
|
| 20 |
|
| लव्हाळ्याच्या जाळावर उकळत ठेवलेल्या भांड्यांतून निघतो, तसा त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघतो. |
|
| 21 |
|
| त्याच्या श्वासाने कोळसे पेट घेतात; त्याच्या तोंडातून अग्निज्वाला निघते. |
|
| 22 |
|
| त्याच्या मानेत बळ असते; त्याच्यापुढे दहशत थयथय नाचत असते. |
|
| 23 |
|
| त्याचे मांसल भाग दाट असतात; ते त्याच्या अंगात घट्ट बसलेले असतात, हलत नाहीत. |
|
| 24 |
|
| त्याचा ऊर पाषाणासारखा कठीण आहे; जात्याच्या खालच्या तळीसारखा तो कणखर आहे. |
|
| 25 |
|
| त्याने डोके वर केले की वीरही घाबरतात; भीतीने त्यांची गाळण उडते. |
|
| 26 |
|
| कोणी त्याच्यावर तलवार चालवली तर ती त्याला लागत नाही; भाला, बरची, तीर ही काहीच त्याला लागत नाहीत. |
|
| 27 |
|
| तो लोखंडाला कस्पटासमान, पितळेला कुजलेल्या लाकडासमान लेखतो. |
|
| 28 |
|
| बाण त्याला पळवत नाही; गोफणगुंडे त्याला भुसासारखे लागतात. |
|
| 29 |
|
| गदा तो कस्पटासमान लेखतो; परजणार्या भाल्याला तो हसतो. |
|
| 30 |
|
| त्याच्या अंगाचे खालचे भाग तीक्ष्ण धारेच्या खापर्यांसारखे आहेत; तो चिखलांवर जसा काय कुळव फिरवतो. |
|
| 31 |
|
| तो सागर रांजणासारखा घुसळतो; तो समुद्र मलमाच्या भांड्यासारखा करून सोडतो, |
|
| 32 |
|
| तो आपल्यामागून पाण्याचा माग प्रकाशयुक्त करतो; तेव्हा सागर शुभ्र केशधार्यासारखा भासमान होतो. |
|
| 33 |
|
| जन्मतःच भीतिविरहित असा भूतलावर त्याच्यासारखा कोणी नाही. |
|
| 34 |
|
| तो उंच असलेल्या सर्वांकडे नजर लावण्यास भीत नाही; तो सर्व उन्मत्त पशूंचा राजा आहे.” |
|
|
|
|