|
| 1 |
|
| “लिव्याथानाला माशाचा गळ घालून तू पकडू शकशील काय किंवा त्याच्या जिभेला दोर बांधू शकशील काय? |
|
| 2 |
|
| त्याच्या नाकातून तू दोरखंड टाकू शकतो काय किंवा त्याच्या जाभाडामध्ये आकडा खुपसशील काय? |
|
| 3 |
|
| दयेसाठी तो तुझ्याकडे विनवणी करीत राहील काय? तो तुझ्याशी सौम्य शब्दांनी बोलेल काय? |
|
| 4 |
|
| जन्मभर तुझा गुलाम म्हणून तू त्याला ठेवावे म्हणून तो तुझ्याशी करार करेल का? |
|
| 5 |
|
| एखाद्या पाळीव पक्ष्यासारखा तू त्याला ठेवशील काय किंवा तुझ्या घरातील तरुण स्त्रियांसाठी साखळीला बांधून ठेवू शकशील? |
|
| 6 |
|
| विक्रेते त्याच्यासाठी बोली लावतील काय? व्यापारी लोक त्याची आपसात वाटणी करून घेतील काय? |
|
| 7 |
|
| त्याच्या गुप्त चामड्यात बरची रोवशील काय किंवा मत्स्यबाण त्याच्या डोक्यात खुपसता येईल काय? |
|
| 8 |
|
| जर तू आपला हात त्याच्यावर ठेवला, तर त्या संघर्षाचे तुला स्मरण होऊन तसे तू पुन्हा कधीही करणार नाही! |
|
| 9 |
|
| त्याच्यावर वर्चस्व करण्याची कोणतीही आशा खोटी आहे; तो केवळ नजरेसमोर असणेच अत्यंत तीव्रतेचे आहे. |
|
| 10 |
|
| त्याला भडकवू शकेल इतके उग्र कोणीही नाही. तर मग माझ्याविरुद्ध कोण उभा राहील? |
|
| 11 |
|
| मला कोणाचे काही देणे लागते असा दावा कोणाकडे आहे? आकाशाखाली आहे ते सर्वकाही माझेच आहे. |
|
| 12 |
|
| “लिव्याथानाचे अवयव, त्याची शक्ती आणि त्याच्या शरीराच्या आकर्षक आकाराविषयी बोलण्यास मी चुकणार नाही. |
|
| 13 |
|
| त्याची बाह्य कातडी कोण उतरवू शकणार? त्याच्या दुहेरी चिलखतामधून कोण भेद करू शकेल? |
|
| 14 |
|
| जी भयानक दातांनी घेरलेली आहे, अशी त्याची मुखद्वारे उघडण्याचे धाडस कोणाला आहे? |
|
| 15 |
|
| त्याच्या पाठीवर ढालीच्या रांगा आहेत ज्या घट्ट एकत्र मुद्रित केलेल्या आहेत; |
|
| 16 |
|
| ती एकमेकांना इतकी जखडून आहेत की त्यामधून हवा देखील पार होऊ शकत नाही. |
|
| 17 |
|
| ती एकमेकांना घट्ट जोडलेली आहेत; ती एकमेकांना लगटून असतात आणि ती वेगळी करता येत नाहीत. |
|
| 18 |
|
| त्याच्या फुरफुरण्यातून प्रकाशाचे झोत येतात; त्याचे डोळे प्रभात किरणांसारखे आहेत. |
|
| 19 |
|
| त्याच्या मुखातून ज्वाला उफाळून येतात; अग्नीच्या ठिणग्या बाहेर उसळतात. |
|
| 20 |
|
| जळत्या लव्हाळ्यावर उकळत असलेल्या पात्रातून यावा तसा त्याच्या नाकपुड्यातून धूर निघत असतो. |
|
| 21 |
|
| त्याच्या श्वासाने कोळसा पेट घेतो, आणि त्याच्या मुखातून तापलेल्या ज्वाला पडतात. |
|
| 22 |
|
| त्याच्या मानेत सामर्थ्य राहते; त्याच्यापुढे भीती चालत असते. |
|
| 23 |
|
| त्याच्या मांसाचे थर घट्टपणे जोडलेले आहेत; ते दृढ आणि अढळ असतात. |
|
| 24 |
|
| त्याची छाती खडकासारखी कडक आहे, जात्याच्या तळीसारखी कणखर आहे. |
|
| 25 |
|
| तो जेव्हा उभा राहतो, पराक्रमी भयभीत होतात; त्याचा वार होण्याआधीच ते माघार घेतात. |
|
| 26 |
|
| त्याच्यावर वार केलेल्या तलवारीचा, अथवा भाला, बरची किंवा बाणाचा त्याच्यावर काहीही प्रभाव पडत नाही. |
|
| 27 |
|
| लोखंडाला तो वाळलेल्या गवतासारखे आणि कास्याला कुजलेले लाकूड असे लेखतो. |
|
| 28 |
|
| बाण त्याला पळवून लावू शकत नाही; आणि गोफणधोंडे त्याला भुसकटासारखे आहेत. |
|
| 29 |
|
| लाठी त्याला पेंढीच्या तुकड्यासारखीच वाटते; भाल्याच्या खुळखुळण्याला तो हसत असतो. |
|
| 30 |
|
| त्याच्या पोटावरील भाग तीक्ष्ण धारेच्या खापर्यांसारखा आहे, मळणीच्या घणाप्रमाणे आपल्या खुणा चिखलावर मागे सोडतो. |
|
| 31 |
|
| तो खोल समुद्राला उकळत्या कढईप्रमाणे घुसळतो आणि तेलाच्या पात्रासारखे सागरास ढवळतो. |
|
| 32 |
|
| तो आपल्यामागे चमकणारा मार्ग सोडतो; की एखाद्याला वाटेल की सागराला पांढरे केस आहेत. |
|
| 33 |
|
| त्याच्यासारखे पृथ्वीवर काहीही नाही; तो एक निर्भय प्राणी आहे. |
|
| 34 |
|
| तो घमेंडखोरांना खाली बघायला लावतो; जे सर्व गर्विष्ठ आहेत, त्यांचा तो राजा आहे.” |
|
|
|
|