|
| 1 |
|
| “ह्या जगात मनुष्याला कष्ट करण्याची मुदत ठेवली आहे ना? एखाद्या मजुराप्रमाणे त्याला दिवस कंठावे लागतात ना? |
|
| 2 |
|
| आपल्याला सावलीत कधी बसायला मिळेल म्हणून दास उत्कंठित होतो, मजूर आपल्या वेतनाची वाट पाहतो, |
|
| 3 |
|
| त्याप्रमाणे निराशेत महिन्यांचे महिने मला घालायचे आहेत, कष्टाच्या रात्री माझ्या वाट्याला आहेत. |
|
| 4 |
|
| मी पडलो असता म्हणतो, ‘मी केव्हा उठेन? रात्र केव्हा निघून जाईल?’ दिवस उजाडेपर्यंत मी एकसारखा तळमळत राहतो. |
|
| 5 |
|
| माझा देह किड्यांनी व धुळीच्या थरांनी भरला आहे; माझी त्वचा बरी होते आणि पुन्हा चिघळते. |
|
| 6 |
|
| माझे दिवस साळ्याच्या धोट्यापेक्षा त्वरित जातात; ते निराशेने निघून जातात. |
|
| 7 |
|
| माझा प्राण केवळ वायू आहे, माझ्या डोळ्यांना पुन्हा कल्याण दिसणार नाही, हे लक्षात आणा. |
|
| 8 |
|
| जो मला आता पाहत आहे त्याच्या डोळ्यांना मी पुन्हा दिसणार नाही; तुझे नेत्र माझा शोध करतील, पण मी नसणार. |
|
| 9 |
|
| मेघ ज्याप्रमाणे वितळून नाहीसा होतो, तसा अधोलोकात जाणारा परत वर येत नाही, |
|
| 10 |
|
| तो पुन्हा आपल्या घरी येणार नाही, त्याचे वसतिस्थान त्याला पुन्हा ओळखणार नाही. |
|
| 11 |
|
| ह्यामुळे मी आपले तोंड आटोपणार नाही; मी आपल्या मनाचा खेद उघड करून सांगेन; माझ्या जिवास क्लेश होतात म्हणून मी गार्हाणे करीन. |
|
| 12 |
|
| मी काय सागर किंवा समुद्रातला राक्षस आहे म्हणून तू माझ्यावर सक्त नजर ठेवतोस? |
|
| 13 |
|
| माझा बिछाना मला शांती देईल, ‘माझा पलंग माझा खेद काहीसा हलका करील’ असे मी म्हणतो;’ |
|
| 14 |
|
| तेव्हा तू मला स्वप्ने पाडून घाबरे करतोस, मला दृष्टान्त दाखवून भयभीत करतोस; |
|
| 15 |
|
| म्हणून माझ्या अस्थिपंजरापेक्षा माझा गळा दाबून मला मारले तर ते मला बरे! |
|
| 16 |
|
| मला आपल्या जिवाचा वीट आला आहे; सर्वकाळ जगणे मला नको. माझे नाव सोडून दे, कारण माझे दिवस श्वासवत आहेत. |
|
| 17 |
|
| मानव तो काय की तू त्याला थोर मानावे, आपले चित्त त्याच्यावर ठेवावे, |
|
| 18 |
|
| रोज सकाळी त्याचा समाचार घ्यावा, व क्षणोक्षणी त्याची कसोटी पाहावी? |
|
| 19 |
|
| तू माझ्यावरची आपली नजर काढत नाहीस, अवंढा घोटायलाही अवसर देत नाहीस, असे कोठवर चालणार? |
|
| 20 |
|
| हे मानवरक्षका! मी पाप केले असले तर त्यात तुझे काय गेले? तू मला आपले निशाण का करून ठेवले आहेस? मी आपणाला भार मात्र झालो आहे. |
|
| 21 |
|
| तू माझा अपराध का क्षमा करत नाहीस? माझ्या ठायीचा दोष का घालवत नाहीस? आता तर मी धुळीत पडून राहणार तू माझा पुष्कळ शोध करशील पण मी नसणार.” |
|
|
|
|