|
| 1 |
|
| तेव्हा बिल्दद शूहीने उत्तर दिले, |
|
| 2 |
|
| “कुठवर अशा गोष्टी तू बोलत राहशील? सोसाट्याच्या वार्यासारखे तुझे शब्द आहेत. |
|
| 3 |
|
| परमेश्वर न्याय विपरीत करतात काय? सर्वसमर्थ जे योग्य आहे त्याचा विपर्यास करतात काय? |
|
| 4 |
|
| जेव्हा तुझ्या मुलांनी त्यांच्याविरुद्ध पाप केले, म्हणून परमेश्वराने त्यांच्या पापाची त्यांना शिक्षा केली. |
|
| 5 |
|
| परंतु जर तू मनःपूर्वक परमेश्वराला शोधशील आणि सर्वसमर्थाकडे विनवणी करशील, |
|
| 6 |
|
| जर तू शुद्ध व सरळ आहेस, आतासुद्धा ते तुझ्या वतीने उभे राहतील आणि तुला तुझ्या समृध्दीच्या स्थितीत पुनर्स्थापित करतील. |
|
| 7 |
|
| तुझा प्रारंभ लीन असला, तरी तुझे भावी आयुष्य समृद्धीचे होईल. |
|
| 8 |
|
| “पूर्वीच्या पिढ्यांना विचार आणि त्यांचे पूर्वज काय शिकले ते शोधून काढ, |
|
| 9 |
|
| कारण आपण तर केवळ काल जन्माला आलो आहोत आणि आपण काही जाणत नाही, आणि पृथ्वीवरील आपले दिवस केवळ सावलीच आहे. |
|
| 10 |
|
| आपले पूर्वज तुला बोध करून सांगणार नाहीत काय? त्यांच्या सुज्ञतेचे शब्द ते पुढे आणणार नाहीत काय? |
|
| 11 |
|
| लव्हाळ्याची चिखला वाचून वाढ होईल काय? वेत पाण्याविना भरभरून वाढेल काय? |
|
| 12 |
|
| तो वाढतो पण कापला जात नाही, गवतापेक्षा तो लवकर सुकून जातो. |
|
| 13 |
|
| जे सर्व परमेश्वराला विसरतात त्यांचा शेवट असाच होतो; देवहीन मनुष्याची आशा नष्ट होते. |
|
| 14 |
|
| ठिसूळ गोष्टींवर त्यांची भिस्त असते, ज्यावर ते अवलंबून राहतात ते मकडीच्या जाळासारखे आहे. |
|
| 15 |
|
| ते जाळ्यावर विसंबून राहतील, परंतु ते टिकून राहवयाचे नाही; ते त्याला बिलगतील, परंतु ते मजबूत राहत नाहीत. |
|
| 16 |
|
| सूर्यप्रकाशात भरपूर पाणी दिलेल्या रोपट्यासारखे ते होतात. त्यांच्या फांद्या बागेत सर्वत्र पसरतात. |
|
| 17 |
|
| त्याची मुळे दगडांच्या चोहो बाजूंना वेढतात. आणि त्यांच्यामध्ये आपली जागा शोधतात. |
|
| 18 |
|
| परंतु जेव्हा त्याला त्याच्या जागेवरून उपटून टाकले जाते, तर ती जागा त्याला नाकारून म्हणते, ‘मी तुला कधीही पाहिले नाही.’ |
|
| 19 |
|
| त्याचे जीवन खचित कोमेजून जाते, आणि मातीतून दुसरी रोपटे आनंदाने उगवतात. |
|
| 20 |
|
| “परंतु पाहा! जो निर्दोष आहे, अशाचा परमेश्वर धिक्कार करत नाही, किंवा दुष्कर्म्याचा हातही सबळ करत नाही. |
|
| 21 |
|
| परमेश्वर अजूनही तुझे मुख हास्याने, व तुझे ओठ आनंद घोषाने भरतील. |
|
| 22 |
|
| तुझे शत्रू लज्जा पांघरतील, आणि दुष्टांचे निवासस्थान अस्तित्वात राहणार नाही.” |
|
|
|
|