|
| 1 |
|
| मग इय्योबाने उत्तर दिले, |
|
| 2 |
|
| “खरोखर, हे सत्य आहे हे मी जाणतो. परंतु सामान्य मनुष्य परमेश्वरासमोर आपली निर्दोषता कशी सिद्ध करेल? |
|
| 3 |
|
| त्याने जरी परमेश्वराशी वाद करण्याचे ठरविले, तरी हजारातून एकाचेही उत्तर त्याला देता येणार नाही. |
|
| 4 |
|
| त्यांचे ज्ञान अगाध व त्यांचे सामर्थ्य विशाल आहे. त्यांच्याशी विरोध करून कोण टिकला आहे? |
|
| 5 |
|
| ते पर्वतांना त्यांना नकळत त्यांच्या ठिकाणातून हलवितात, आणि आपल्या रागात त्यांना उलथून टाकतात. |
|
| 6 |
|
| ते पृथ्वीला तिच्या जागेवरून हालवितात, आणि तिचे स्तंभ डळमळीत करतात. |
|
| 7 |
|
| ते सूर्याशी बोलतात आणि तो प्रकाशित होत नाही; ते तार्यांचा प्रकाश मुद्रित करतात. |
|
| 8 |
|
| तेच एकटे आकाश ताणून पसरवितात आणि समुद्राच्या लाटांवरून चालतात. |
|
| 9 |
|
| सप्तर्षी, मृगशीर्ष, कृत्तिका आणि दक्षिणेकडील नक्षत्रमंडळे यांचा तेच उत्पन्नकर्ता आहेत. |
|
| 10 |
|
| आकलन करू शकत नाही अशी अद्भुत कृत्ये; आणि मोजता येत नाहीत असे चमत्कार ते करतात. |
|
| 11 |
|
| ते माझ्या जवळून जातात; पण मी त्यांना पाहू शकत नाही; ते निघून जातात तरी मला आकलन होत नाही. |
|
| 12 |
|
| जर त्यांनी हिसकावून घेतले तरी त्यांना कोण थांबवेल? ‘तुम्ही काय करता,’ असे त्यांना कोण विचारणार? |
|
| 13 |
|
| परमेश्वर आपला क्रोध आवरत नाहीत; राहाबाच्या सैन्याची टोळी सुद्धा त्यांच्यापुढे गुडघे टेकते. |
|
| 14 |
|
| “तर मी त्यांच्याशी कसा वाद घालणार? त्यांच्याशी वाद घालण्यास शब्द मी कसे शोधू? |
|
| 15 |
|
| मी जरी निर्दोष असलो, तरी मी त्यांना उत्तर देणार नाही; मी केवळ माझ्या न्यायाधीशाजवळ दयेची भीक मागेन. |
|
| 16 |
|
| मी धावा केला असता तर त्यांनी प्रतिसाद दिला असता; तरी ते माझे ऐकतीलच अशी मला खात्री नाही. |
|
| 17 |
|
| वादळाने ते मला चेंगरून टाकतात आणि विनाकारण माझ्या जखमा वाढवतात. |
|
| 18 |
|
| ते मला श्वास घेऊ देत नाहीत, परंतु मला क्लेशांनी त्रस्त करतात. |
|
| 19 |
|
| जर बळाविषयी म्हटले तर, तेच बलवान आहेत! आणि जरी न्यायासंदर्भात म्हटले तर त्यांना कोण आव्हान देईल? |
|
| 20 |
|
| मी जरी निर्दोष असलो, तरी माझे मुख माझा निषेध करेल; मी दोषरहित असतो, तरी माझे मुख मलाच दोषी ठरवेल. |
|
| 21 |
|
| “मी जरी निर्दोष असलो, मला स्वतःबद्दल चिंता नाही; मी स्वतः माझे जीवन तुच्छ मानतो. |
|
| 22 |
|
| हे सर्व समानच आहे म्हणून मी म्हणतो, ‘निर्दोषी आणि दोषी या दोघांचाही ते नाश करतात.’ |
|
| 23 |
|
| जेव्हा एखादी पीडा अचानक मरण आणते, निरपराध्यांच्या निराशेचा ते उपहास करतात. |
|
| 24 |
|
| जेव्हा पृथ्वी दुष्टाच्या हाती जाते, ते न्यायाधीशांचे डोळे झाकतात. जर ते नाहीत, तर मग कोण? |
|
| 25 |
|
| “माझे दिवस एखाद्या धावपट्टू पेक्षाही वेगवान आहेत; आनंदाची झलक नसतानाच ते उडून जातात. |
|
| 26 |
|
| ते लव्हाळ्याच्या वेगवान तारवांसारखे, भक्ष्यावर झडप घालणार्या गरुडासारखे निघून जात आहेत. |
|
| 27 |
|
| मी जर म्हणालो की, ‘मी माझे गार्हाणे विसरेन, माझे भाव बदलून उल्हास करेन,’ |
|
| 28 |
|
| तरी माझ्यावर आणखी मोठी दुःखे येतील; कारण हे परमेश्वरा, मला ठाऊक आहे की तुम्ही मला निर्दोष ठरविणार नाही. |
|
| 29 |
|
| मी आधी दोषी ठरविला गेलो आहे, तर मग मी व्यर्थ प्रयत्न का करावे? |
|
| 30 |
|
| जरी मी स्वतःला साबणाने, आणि माझे हात क्षाराने धुतले, |
|
| 31 |
|
| तरी देखील तुम्ही मला चिखलाच्या खड्ड्यात टाकाल, आणि माझी वस्त्रे सुद्धा माझा तिरस्कार करतील. |
|
| 32 |
|
| “कारण ते माझ्यासारखे मानव नाहीत की मी त्यांना उत्तर द्यावे, किंवा न्यायालयात आम्ही समोरासमोर येऊन वाद घालू. |
|
| 33 |
|
| परंतु आमच्यामध्ये जर कोणी मध्यस्थी करणारा असता, कोणी आम्हाला एकत्र आणणारा असता, |
|
| 34 |
|
| कोणीतरी परमेश्वराचा दंड माझ्यावरून काढावा, म्हणजे त्यांचा धाक मला अजून भयभीत करणार नाही. |
|
| 35 |
|
| मग मी त्यांच्याशी निर्भयपणे बोलेन, पण या घटकेला, मी ते करू शकत नाही. |
|
|
|
|