पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| धन्य ते लोक, जे दुष्टांच्या मसलतीने चालत नाहीत, किंवा पापी लोकांच्या मार्गात उभे राहत नाहीत, आणि थट्टा करणार्यांच्या संगतीमध्ये बसत नाहीत. |
| 2 |
| पण ज्यांचा आनंद याहवेहच्या नियमांचे पालन करणे, आणि त्यांच्या नियमावर रात्रंदिवस ध्यान करणे असतो. |
| 3 |
| ते अशा वृक्षासारखे आहेत जे सतत वाहणार्या जलप्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या ऋतूमध्ये फळ देते आणि ज्यांची पाने कोमेजत नाहीत. त्यांनी हाती घेतलेले प्रत्येक काम सिद्धीस जाते. |
| 4 |
| परंतु दुष्ट तसे नाहीत. ते वार्याने उडून जाणार्या भुश्यासारखे आहेत. |
| 5 |
| म्हणून दुष्ट न्यायसभेत, किंवा पापी लोक नीतिमानांच्या सभेमध्ये उभे राहणार नाहीत. |
| 6 |
| कारण नीतिमानांच्या मार्गावर याहवेह दृष्टी ठेवतात, परंतु दुष्टांचा मार्ग सर्वनाशाकडेच ओढून नेतो. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/001.mp3
150
1