पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| उपकार मानण्याचे स्तोत्र. अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, परमेश्वराचा जयजयकार करा, |
| 2 |
| हर्षाने परमेश्वराची सेवा करा; गीत गात त्याच्यापुढे या. |
| 3 |
| परमेश्वर हाच देव आहे हे जाणा; त्यानेच आम्हांला उत्पन्न केले; आम्ही त्याचेच आहोत1 आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. |
| 4 |
| त्याचे उपकारस्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा; त्याचे उपकारस्मरण करा; त्याच्या नावाचा धन्यवाद करा. |
| 5 |
| कारण परमेश्वर चांगला आहे; त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/100.mp3
150
100