पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| हे समस्त पृथ्वी, याहवेहसाठी जयघोष कर. |
| 2 |
| आनंदाने याहवेहची आराधना करा; हर्षगीतांसह त्यांच्या उपस्थितीत प्रवेश करा. |
| 3 |
| याहवेह हेच परमेश्वर आहेत, हे जाणून घ्या. ते आपले निर्माणकर्ते आहेत व तेच आपले स्वामी आहेत; आपण त्यांचे लोक, त्यांच्या कुरणातील मेंढराप्रमाणे आहोत. |
| 4 |
| उपकारस्तुती करीत त्यांच्या द्वारातून आत जा; स्तुती करीत त्यांच्या अंगणात प्रवेश करा; त्यांचे उपकार माना, त्यांच्या नावाला महिमा द्या. |
| 5 |
| कारण याहवेह चांगले आहेत आणि त्यांची प्रीती सनातन आहे; त्यांचा विश्वासूपणा पिढ्यान् पिढ्या टिकून राहतो. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/100.mp3
150
100