|
| 1 |
|
| व्याकूळ होऊन आपले गार्हाणे परमेश्वरापुढे मांडणार्या दीनाने करायची प्रार्थना हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक, माझी आरोळी तुझ्याकडे पोहचो. |
|
| 2 |
|
| माझ्या संकटाच्या दिवशी तू माझ्यापासून आपले मुख लपवू नकोस; तू आपला कान माझ्याकडे लाव; मी धावा करीन त्या दिवशी माझे सत्वर ऐक. |
|
| 3 |
|
| माझे दिवस धुराप्रमाणे विरून जातात, माझी हाडे चुलीतल्या निखार्यासारखी गळून गेली आहेत. |
|
| 4 |
|
| माझे हृदय गवताप्रमाणे वाळून करपले आहे, कारण मला अन्न खाण्याचेही भान राहत नाही. |
|
| 5 |
|
| मोठ्याने कण्हून कण्हून माझी चामडी माझ्या हाडांना चिकटून गेली आहे; |
|
| 6 |
|
| मी रानातल्या पाणकोळ्यासारखा झालो आहे. वैराण प्रदेशातील घुबडाप्रमाणे मी झालो आहे. |
|
| 7 |
|
| मी जागरण करीत आहे, धाब्यावर एकटे राहणार्या चिमण्यासारखा मी झालो आहे. |
|
| 8 |
|
| माझे वैरी दिवसभर माझी निंदा करतात; माझ्यावर खवळलेले लोक माझ्यावरून शाप देतात. |
|
| 9 |
|
| मी भाकरीप्रमाणे राख खाल्ली आहे; व माझ्या पाण्यात माझी आसवे मिसळली आहेत. |
|
| 10 |
|
| ह्याला कारण तुझा रोष, तुझा क्रोध; कारण तू मला वर उचलून फेकून दिले आहेस. |
|
| 11 |
|
| माझे दिवस वाढत्या सावलीसारखे झाले आहेत; गवताप्रमाणे मी वाळून गेलो आहे. |
|
| 12 |
|
| हे परमेश्वरा, तू सर्वकाळ राजासनारूढ आहेस; तुझ्या नावाचे स्मरण पिढ्यानपिढ्या कायम राहील. |
|
| 13 |
|
| तू उठून सीयोनेवर दया करशील; कारण तिच्यावर कृपा करण्याचा समय आला आहे. नेमलेला समय येऊन ठेपला आहे; |
|
| 14 |
|
| तुझ्या सेवकांना तिचे दगडही प्रिय आहेत तिची धूळधाण पाहून ते हळहळतात. |
|
| 15 |
|
| राष्ट्रे परमेश्वराच्या नावाला, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझ्या ऐश्वर्याला भितील; |
|
| 16 |
|
| कारण परमेश्वराने सीयोन पुन्हा बांधली आहे, तो आपल्या गौरवाने प्रकट झाला आहे; |
|
| 17 |
|
| त्याने निराश्रितांच्या प्रार्थनेकडे लक्ष दिले आहे; त्यांची प्रार्थना त्याने तुच्छ मानली नाही. |
|
| 18 |
|
| पुढच्या पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल; पुढे उत्पन्न होणारी प्रजा परमेशाचे स्तवन करील; |
|
| 19 |
|
| कारण परमेश्वराने आपल्या उच्च पवित्रस्थानावरून खाली पाहिले; त्याने आकाशातून पृथ्वीकडे पाहून |
|
| 20 |
|
| बंदिवानांचे उसासे ऐकले, ज्यांचे मरण ठरले होते त्यांना सोडवले; |
|
| 21 |
|
| ह्यासाठी की त्यांनी सीयोनेत परमेश्वराच्या नावाची घोषणा करावी, व यरुशलेमात त्याची स्तुती गावी; |
|
| 22 |
|
| परमेश्वराची उपासना करण्यास लोक व राज्ये एकत्र होतील तेव्हा असे होईल. |
|
| 23 |
|
| त्याने माझी शक्ती मार्गातच क्षीण केली; त्याने माझे आयुष्य कमी केले. |
|
| 24 |
|
| मी म्हणालो, “हे माझ्या देवा, माझा आयुष्यकाल पुरा होण्यापूर्वी मला घेऊन जाऊ नकोस; तुझी वर्षे पिढ्यानपिढ्या चालत आहेत.” |
|
| 25 |
|
| तू पुरातन काळी पृथ्वीचा पाया घातलास; गगने तुझ्या हातचे कृत्य आहे. |
|
| 26 |
|
| ती नाहीशी होतील, परंतु तू निरंतर आहेस; ती सगळी वस्त्रासारखी जीर्ण होतील; ती तू प्रावरणासारखी बदलशील आणि ती नाहीशी होतील. |
|
| 27 |
|
| परंतु तू तोच आहेस, तुझ्या वर्षांना अंत नाही. |
|
| 28 |
|
| तुझ्या सेवकांचे वंशज कायम टिकून राहतील, त्यांची संतती तुझ्यासमोर स्थायिक होईल. |
|
|
|
|