|
| 1 |
|
| हे याहवेह, माझी प्रार्थना ऐका; माझी मदतीची विनवणी तुमच्यापर्यंत पोहचो. |
|
| 2 |
|
| मी संकटसमयात असता तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका. जेव्हा मी तुमचा धावा करेन तेव्हा मला त्वरेने उत्तर द्या; तुमचे कान माझ्याकडे लावा. |
|
| 3 |
|
| कारण माझे दिवस धुरासारखे विरून जात आहेत; माझ्या हाडांचा जळत्या कोळशासारखा दाह होत आहे. |
|
| 4 |
|
| माझे हृदय गवताप्रमाणे करपून व कोमेजून गेले आहे; अन्न सेवन करण्याचेही मला स्मरण होत नाही. |
|
| 5 |
|
| निराशेने आता अधिकच उच्चस्वरात कण्हत असून मी कातडी व हाडे यांचा सापळा झालो आहे. |
|
| 6 |
|
| ओसाड प्रदेशातील घुबडासारखा, भग्नावशेषातील घुबडासारखा मी झालो आहे. |
|
| 7 |
|
| मी जागाच राहतो. छपरावर एकाकी असणार्या पक्ष्यासारखा मी झालो आहे. |
|
| 8 |
|
| माझे शत्रू दिवसेंदिवस मला टोचून बोलतात; आणि माझा उपहास करणारे माझे नाव एखाद्या श्रापासारखे देतात. |
|
| 9 |
|
| मी अन्न म्हणून राख खात आहे; आणि माझे अश्रू माझ्या पेयात मिश्रित होतात, |
|
| 10 |
|
| तुम्ही माझ्यावर क्रोधाविष्ट झाला आहात; कारण संतापाने तुम्ही मला उचलून फेकून दिले. |
|
| 11 |
|
| सायंकाळच्या सावलीप्रमाणे माझे आयुष्य वेगाने संपत आहे; मी गवताप्रमाणे वाळून जात आहे. |
|
| 12 |
|
| परंतु हे याहवेह देवा, तुम्ही सदासर्वकाळ सिंहासनावर विराजमान आहात; तुमची किर्ती पिढ्यान् पिढ्या टिकून राहील. |
|
| 13 |
|
| तुम्ही याल आणि सीयोनावर दया कराल, कारण तिच्यावरील कृपादृष्टीची वेळ येऊन ठेपली आहे; तो निश्चित समय आलेला आहे. |
|
| 14 |
|
| यातील प्रत्येक धोंड्यावर तुमचे सेवक प्रीती करतात; येथील धूळ देखील त्यांचे मन द्रवित करते. |
|
| 15 |
|
| सर्व राष्ट्रे तुमच्या नामाचे भय धरतील, पृथ्वीवरील सर्व राजे तुमच्या गौरवासमोर नतमस्तक होतील. |
|
| 16 |
|
| कारण याहवेह सीयोनाची पुनर्बांधणी करतील; आणि त्यांच्या गौरवाने प्रगट होतील. |
|
| 17 |
|
| निराधार लोकांच्या प्रार्थना ते ऐकतील; त्यांच्या विनवण्यांचा ते तिरस्कार करणार नाहीत. |
|
| 18 |
|
| भावी पिढ्यांच्या हितासाठी हे सर्व नमूद करून ठेवले जावो, जे आजपर्यंत अस्तित्वात नाहीत, तेही याहवेहची स्तुती करतील: |
|
| 19 |
|
| “याहवेहने आपल्या महान पवित्रस्थानातून खाली दृष्टी टाकली, त्यांनी स्वर्गातून पृथ्वीकडे पाहिले, |
|
| 20 |
|
| जेणेकरून गुलामगिरीतील लोकांचे कण्हणे ऐकावे आणि मृत्युदंड मिळालेल्यांची सुटका करावी.” |
|
| 21 |
|
| म्हणजे सर्व लोक याहवेह देवाची महिमा सीयोनात जाहीर करतील आणि यरुशलेमात त्यांची स्तुती करतील. |
|
| 22 |
|
| जेव्हा लोक व राष्ट्रेही याहवेहची उपासना करण्यासाठी तिथे येतील. |
|
| 23 |
|
| माझ्या जीवनयात्रेच्या मध्येच त्यांनी माझे बळ तोडले; त्यांनी माझे आयुष्य कमी केले. |
|
| 24 |
|
| पण मी त्यांना आरोळी मारली: “हे परमेश्वरा, आयुष्याच्या मध्यातच मला मृत्यू येऊ देऊ नका; तुमची वर्षे पिढ्यान् पिढ्या निरंतर असतात. |
|
| 25 |
|
| प्रारंभी पृथ्वीचा पाया तुम्हीच घातला, आणि आपल्या हातांनी तुम्ही गगनमंडळे निर्माण केलीत. |
|
| 26 |
|
| ती नष्ट होतील, परंतु तुम्ही निरंतर राहाल; ती सर्व जुन्या वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील; जुनी वस्त्रे टाकून नवी घालावी, तसे तुम्ही त्यांना बदलून टाकाल. |
|
| 27 |
|
| परंतु तुम्ही निरंतर समान राहणार, आणि तुमची वर्षे कधीही संपुष्टात येणार नाहीत. |
|
| 28 |
|
| तुमच्या सेवकांचे संतान तुमच्या उपस्थितीत टिकून राहतील; तुमच्या संरक्षणाखाली त्यांच्या वंशजांचे जतन होईल.” |
|
|
|
|