|
| 1 |
|
| परमेश्वराचे उपकारस्मरण करा, त्याच्या नावाचा धावा करा; राष्ट्रांना त्याची कृत्ये जाहीर करा. |
|
| 2 |
|
| त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा; त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा. |
|
| 3 |
|
| त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा; जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत त्यांचे मन हर्षित होवो. |
|
| 4 |
|
| परमेश्वर व त्याचे सामर्थ्य ह्यांचा शोध करा; त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. |
|
| 5 |
|
| त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार, व त्याच्या तोंडचे निर्णय आठवा. |
|
| 6 |
|
| त्याचा सेवक अब्राहाम ह्याचे वंशजहो, त्याचे निवडलेले याकोबाचे वंशजहो, तुम्ही असे करा. |
|
| 7 |
|
| तो परमेश्वर आमचा देव आहे; त्याची न्यायकृत्ये सर्व पृथ्वीभर आहेत. |
|
| 8 |
|
| तो आपला करार म्हणजे हजारो पिढ्यांसाठी आज्ञापिलेले आपले वचन सर्वकाळ आठवतो; |
|
| 9 |
|
| हा करार त्याने अब्राहामाशी केला आणि त्याविषयी इसहाकाजवळ शपथ वाहिली; |
|
| 10 |
|
| ती त्याने याकोबासाठी नियम, इस्राएलासाठी सर्वकाळचा करार ह्या रूपाने कायम केली; |
|
| 11 |
|
| तो म्हणाला, “कनान देश तुझा वतनभाग म्हणून मी तुला देईन.” |
|
| 12 |
|
| त्या वेळी ते मोजके, फार थोडके होते, व तेही त्या देशात उपरे असे होते. |
|
| 13 |
|
| ते राष्ट्राराष्ट्रांतून, एका राज्यातून दुसर्या लोकांत हिंडले. |
|
| 14 |
|
| त्याने कोणत्याही मनुष्याला त्यांना उपद्रव करू दिला नाही, त्यांच्यासाठी त्याने राजांचाही निषेध करून म्हटले की, |
|
| 15 |
|
| “माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका, माझ्या संदेष्ट्यांना उपद्रव देऊ नका.” |
|
| 16 |
|
| त्याने देशावर दुष्काळ आणला; त्यांचा अन्नाचा आधार अगदी तोडून टाकला. |
|
| 17 |
|
| त्यांच्यापुढे त्याने एक मनुष्य पाठवला; योसेफ दास म्हणून विकला गेला; |
|
| 18 |
|
| त्यांनी त्याला बेड्या घालून त्याच्या पायांना इजा केली; त्याच्या गळ्यात लोखंडी कडे अडकवले. |
|
| 19 |
|
| त्याच्या सांगण्याप्रमाणे घडून येईपर्यंत परमेश्वराच्या वचनाने त्याला पारखले. |
|
| 20 |
|
| राजाने माणसे पाठवून त्याला सोडवले; राष्ट्रांच्या अधिपतीने त्याला मुक्त केले. |
|
| 21 |
|
| त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी, आपल्या सर्व संपत्तीवर अधिकारी नेमले, |
|
| 22 |
|
| अशासाठी की, त्याने आपल्या मनाप्रमाणे त्याच्या सरदारांना शिकवावे आणि त्याच्या मंत्र्यांना शहाणपण सांगावे. |
|
| 23 |
|
| नंतर इस्राएल मिसर देशात आला; याकोब हामाच्या देशात उपरा म्हणून राहिला. |
|
| 24 |
|
| परमेश्वराने आपले लोक पुष्कळ वाढवले, त्यांच्या शत्रूंपेक्षा त्यांना बलिष्ठ केले. |
|
| 25 |
|
| आपल्या लोकांचा त्यांनी द्वेष करावा आणि आपल्या सेवकांशी कपटाने वागावे म्हणून त्याने त्यांच्या शत्रूंचे मन फिरवले. |
|
| 26 |
|
| त्याने आपला सेवक मोशे व आपण निवडलेला अहरोन ह्यांना पाठवले. |
|
| 27 |
|
| त्यांनी त्यांच्यामध्ये परमेश्वराची चिन्हे, हामाच्या देशात अद्भुत कृत्ये करून दाखवली. |
|
| 28 |
|
| त्याने अंधकार पाठवून काळोख पाडला, आणि त्यांनी त्याच्या आज्ञांचे उल्लंघन केले.1 |
|
| 29 |
|
| त्याने मिसर्यांच्या पाण्यांचे रक्त केले व त्यांतील मासे मारून टाकले. |
|
| 30 |
|
| त्यांचा देश, त्यांचे राजवाडे बेडकांनी व्यापून टाकले. |
|
| 31 |
|
| त्याने आज्ञा करताच गोमाश्या आल्या, त्यांच्या सर्व प्रदेशात उवा झाल्या. |
|
| 32 |
|
| त्याने पावसाऐवजी त्यांच्यावर गारा पाडल्या; त्यांच्या देशावर अग्नीचे लोळ पाठवले. |
|
| 33 |
|
| त्याने त्यांचे द्राक्षवेल व अंजीर ह्यांचा विध्वंस केला, त्यांच्या देशातील झाडे मोडून टाकली. |
|
| 34 |
|
| त्याने आज्ञा करताच टोळ व असंख्य नाकतोडे आले. |
|
| 35 |
|
| त्यांनी त्यांच्या देशातील सर्व हिरवळ खाल्ली, त्यांच्या भूमीचे उत्पन्न खाल्ले. |
|
| 36 |
|
| त्याने त्यांच्या देशातील प्रत्येक प्रथमजन्मलेला म्हणजे त्यांच्या पौरुषांचे प्रथमफळ मारले. |
|
| 37 |
|
| त्याने लोकांना सोन्यारुप्यासहित बाहेर नेले; त्याच्या लोकांच्या वंशात कोणी दुर्बल नव्हता. |
|
| 38 |
|
| त्यांच्या जाण्याने मिसरी लोकांना आनंद झाला; कारण त्यांना त्यांचे भय पडले होते. |
|
| 39 |
|
| त्यांच्यावर छत्र होण्यासाठी त्याने ढग पसरला, आणि रात्री प्रकाश देण्यासाठी अग्निस्तंभ दिला. |
|
| 40 |
|
| त्यांनी अन्न मागितले तेव्हा त्याने लावे पक्षी आणले, आणि स्वर्गीय अन्नाने त्यांना तृप्त केले. |
|
| 41 |
|
| त्याने खडक फोडला तेव्हा पाणी निघाले; ते नदीप्रमाणे रुक्ष प्रदेशातून वाहू लागले. |
|
| 42 |
|
| कारण त्याला आपल्या पवित्र वचनाची व आपला सेवक अब्राहाम ह्याची आठवण होती. |
|
| 43 |
|
| त्याने आपल्या लोकांना आनंद करत, आपल्या निवडलेल्या लोकांना जयोत्सव करत बाहेर आणले. |
|
| 44 |
|
| त्याने त्यांना परक्या राष्ट्रांचे देश दिले; त्या लोकांच्या श्रमाचे फळ ह्यांच्या हाती आले, |
|
| 45 |
|
| ह्यासाठी की, त्यांनी आपले नियम पाळावेत, आपल्या नियमशास्त्राप्रमाणे वागावे. परमेशाचे स्तवन करा!2 |
|
|
|
|