|
| 1 |
|
| याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत; त्यांची दया सनातन आहे. |
|
| 2 |
|
| याहवेहनी मुक्त केलेल्यांनी त्याचे कथन करावे— ज्यांची त्यांनी शत्रूपासून सुटका केली आहे, |
|
| 3 |
|
| ज्यांना पूर्व आणि पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशेतून एकत्र गोळा केले आहे. |
|
| 4 |
|
| काहीजण उजाड प्रदेशातून भटकत होते, त्यांना स्थावर होण्यासाठी शहराकडे जाणारा मार्ग सापडत नव्हता. |
|
| 5 |
|
| भूक व तहान यांनी ते व्याकूळ झाले होते, ते दुर्बल होऊ लागले होते. |
|
| 6 |
|
| त्यांच्या संकटात त्यांनी याहवेहकडे आरोळी मारली आणि याहवेहने या दुर्दशेतून त्यांना मुक्त केले. |
|
| 7 |
|
| त्यांनी त्यांना एका अचूक मार्गाने चालविले, आणि वस्ती करण्यास नगरात आणले. |
|
| 8 |
|
| याहवेहच्या या अक्षय प्रीतीबद्दल व त्यांनी सर्व मनुष्यास्तव केलेल्या अद्भुतकार्याबद्दल ते त्यांचे उपकारस्मरण करोत. |
|
| 9 |
|
| कारण ते तहानेल्यास तृप्त करतात, आणि भुकेल्या जिवास उत्तम पदार्थांनी संतुष्ट करतात. |
|
| 10 |
|
| काही अंधारात आणि गडद अंधकारात बसले होते, लोखंडी साखळदंडांत यातना सहन करणारे बंदिवान होते, |
|
| 11 |
|
| कारण त्यांनी परमेश्वराच्या आदेशाविरुद्ध बंडखोरी केली आणि परमोच्चाच्या योजनेला तुच्छ मानले. |
|
| 12 |
|
| मग त्यांनी त्यांना कठोर परिश्रम करण्यास भाग पाडले; ते पडले आणि त्यांचे साहाय्य करण्यास कोणीही नव्हते. |
|
| 13 |
|
| त्यांच्या संकटात त्यांनी याहवेहकडे आरोळी मारली आणि याहवेहने या दुर्दशेतून त्यांना मुक्त केले. |
|
| 14 |
|
| त्यांना काळोखातून आणि गडद अंधकारातून बाहेर आणले, आणि त्यांचे साखळदंड तोडून टाकले. |
|
| 15 |
|
| याहवेहच्या या अक्षय प्रीतीबद्दल व त्यांनी सर्व मनुष्यास्तव केलेल्या अद्भुतकार्याबद्दल ते त्यांचे उपकारस्मरण करोत. |
|
| 16 |
|
| कारण त्यांनीच त्यांचे कास्याचे दरवाजे मोडले, आणि त्यांच्या लोखंडी सळया कापून टाकल्या. |
|
| 17 |
|
| काही लोकांनी त्यांच्या बंडखोर वृत्तीमुळे मूर्खपणा केला, आणि त्यांनी केलेल्या पापामुळे ते पीडित झाले. |
|
| 18 |
|
| त्यांना सर्व अन्नाचा तिटकारा वाटू लागला आणि ते मृत्यू दारात पोहोचले होते. |
|
| 19 |
|
| त्यांच्या संकटात त्यांनी याहवेहकडे आरोळी मारली आणि याहवेहने या दुर्दशेतून त्यांना मुक्त केले. |
|
| 20 |
|
| ते शब्द मात्र बोलले आणि लोक बरे झाले; परमेश्वराने त्यांना कबरेतून बाहेर काढले. |
|
| 21 |
|
| याहवेहच्या या अक्षय प्रीतीबद्दल व त्यांनी सर्व मनुष्यास्तव केलेल्या अद्भुतकार्याबद्दल ते त्यांचे उपकारस्मरण करोत. |
|
| 22 |
|
| ते त्याला उपकारस्तुतीचे यज्ञ अर्पोत, आणि हर्षगीते गाऊन त्यांच्या कृत्यांचे वर्णन करोत. |
|
| 23 |
|
| काहीजण सागरात गलबतांमधून प्रवास करीत; ते महासागरातून येजा करून व्यापार करीत. |
|
| 24 |
|
| त्यांनी याहवेहची कृत्ये, समुद्राच्या खोल तळाशी केलेले चमत्कार पाहिले. |
|
| 25 |
|
| ते बोलले व सागरात प्रचंड उत्पात होऊन, त्या वादळाने लाटा उंचच उंच उसळल्या. |
|
| 26 |
|
| त्या वर आकाशापर्यंत जातात, व मग समुद्रतळापर्यंत खाली येतात; या धोक्यातून जाताना त्यांचा धीर खचतो. |
|
| 27 |
|
| ते मद्यप्यांसारखे डुलतात, झोकांड्या खातात; त्यांची मति कुंठित होते. |
|
| 28 |
|
| त्यांच्या संकटात त्यांनी याहवेहकडे आरोळी मारली आणि याहवेहने या दुर्दशेतून त्यांना मुक्त केले. |
|
| 29 |
|
| त्यांनी वादळ असे शांत केले की ते कुजबुज करू लागले, आणि समुद्राच्या लाटा अगदी स्तब्ध केल्या. |
|
| 30 |
|
| ते शांत वातावरण बघून हे लोक हर्षित झाले, याहवेहनी त्यांना सुखरुपपणे त्यांच्या इच्छित बंदरात आणले. |
|
| 31 |
|
| याहवेहच्या या अक्षय प्रीतीबद्दल व त्यांनी सर्व मनुष्यास्तव केलेल्या अद्भुतकार्याबद्दल ते त्यांचे उपकारस्मरण करोत. |
|
| 32 |
|
| लोकांच्या सभेत त्यांनी जाहीरपणे परमेश्वराचा जयजयकार करावा, आणि पुढार्यांच्या सभेत त्यांची महिमा गावी. |
|
| 33 |
|
| ते नद्या आटवून त्यांचे वाळवंट करतात, आणि झरे आटवून त्यांची कोरडी भूमी करतात; |
|
| 34 |
|
| आणि दुष्टांना त्यांच्या पातकाबद्दल शासन करण्यासाठी, त्यांच्या चांगल्या भूमीचे ते क्षारभूमीत रूपांतर करतात. |
|
| 35 |
|
| पुन्हा ते वाळवंटांचे जलमय भूमीत, आणि शुष्क भूमीचे वाहत्या झर्यात रूपांतर करतात. |
|
| 36 |
|
| तिथे वस्ती करण्यासाठी त्यांनी भुकेल्यांस आणले, व त्या लोकांनी तिथे वस्ती करून शहरे स्थापित केली. |
|
| 37 |
|
| त्या ठिकाणी त्यांनी शेती केली व आपले द्राक्षमळे लावले, ज्यांची त्यांना भरघोस पिके मिळाली. |
|
| 38 |
|
| त्यांनी त्यांना मोठा आशीर्वाद दिला, त्यांची संख्या अनेक पटीने वाढली, तिथे त्यांच्या गुरांचीही हानी होऊ दिली नाही. |
|
| 39 |
|
| परंतु मग त्यांची संख्या घटली, जुलूम, संकट आणि दुःख यामुळे ते लीन झाले. |
|
| 40 |
|
| ते त्यांच्या सरदारांवर निंदा-वृष्टी करतात, त्यांना बिनवाटेच्या टाकाऊ प्रदेशातून भटकवितात. |
|
| 41 |
|
| परंतु गरजवंतांची ते पीडेतून सुटका करतात, आणि त्यांच्या कुटुंबाची कळपासारखी भरभराट करतात. |
|
| 42 |
|
| नीतिमान माणसे हे पाहून आनंदित होतील, परंतु दुष्ट माणसांची तोंडे बंद होतील. |
|
| 43 |
|
| ज्ञानी जणांनी या सर्व गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे आणि याहवेहच्या प्रेममय कृत्यांचे चिंतन करावे. |
|
|
|
|