पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| हे परमेश्वरा, माझे अंतःकरण खंबीर आहे; मी पूर्ण अंतःकरणाने गायन आणि वादन करेन. |
| 2 |
| अगे सारंगी आणि वीणे, जागृत व्हा! मी प्रातःकाळाला जागृत करेन. |
| 3 |
| हे याहवेह, प्रत्येक राष्ट्रात मी तुमची स्तुती करेन, मी सर्व लोकात तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन. |
| 4 |
| कारण तुमचे वात्सल्य महान, गगनमंडळाहून उंच आहे; तुमचे विश्वासूपण आकाशाला जाऊन पोहोचते. |
| 5 |
| हे परमेश्वरा, तुम्ही गगनमंडळाहून उदात्त केले जावोत; तुमचे गौरव सर्व पृथ्वी व्यापून टाको. |
| 6 |
| आम्हाला वाचवा आणि तुमच्या उजव्या हाताने मदत करा, म्हणजे तुम्ही ज्यांच्यावर प्रीती करता त्यांचे तारण होईल. |
| 7 |
| परमेश्वराने त्यांच्या पवित्रस्थानी घोषणा केली: “मी विजयाने शेखेमचे विभाजन करेन, आणि सुक्कोथाचे खोरे मोजून त्याचे इतरांना वाटप करेन. |
| 8 |
| गिलआद माझा आहे. मनश्शेह माझा आहे; एफ्राईम माझे शिरस्त्राण आहे, यहूदाह माझा राजदंड आहे. |
| 9 |
| मोआब माझे हात धुण्याचे पात्र, आणि एदोमावर मी माझी पादत्राणे फेकेन; पलेशेथावर मी विजयाचा जयघोष करेन.” |
| 10 |
| मला तटबंदीच्या नगरात कोण आणेल? मला एदोम प्रांतात कोण नेईल? |
| 11 |
| परमेश्वरा, तुम्हीच आम्हाला नाकारले आहे ना, आणि आता तुम्ही आमच्या सैन्याबरोबरही जात नाही? |
| 12 |
| शत्रूविरुद्ध तुम्ही आमचा पुरवठा करा, कारण मानवाचे साहाय्य व्यर्थ आहे. |
| 13 |
| परमेश्वराच्या साहाय्याने आमचा विजय सुनिश्चित आहे, आणि तेच आमच्या शत्रूंना पायदळी तुडवतील. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/108.mp3
150
108