पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| याहवेह माझ्या प्रभूला म्हणाले: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत, तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” |
| 2 |
| याहवेहच सीयोनातून तुझ्या सामर्थ्यवान राजदंडाचा विस्तार करतील व म्हणतील, “तू तुझ्या शत्रूंवर सत्ता गाजव!” |
| 3 |
| तुझी सेना युद्ध समयी स्वेच्छेने तुला साथ देईल. प्रातःकाळाच्या गर्भातून जन्मलेल्या दवाप्रमाणे पवित्रतेने सुशोभित होऊन तुझे तरुण तुझ्याकडे येतील. |
| 4 |
| याहवेहने जी शपथ घेतली आहे आणि ते त्यांचे मन कदापि बदलणार नाहीत: “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू सदासर्वकाळचा याजक आहेस.” |
| 5 |
| तुझ्या उजव्या हाताशी प्रभूचे सानिध्य आहे; आपल्या क्रोधाच्या दिवशी ते अनेक राजांना तुडवतील. |
| 6 |
| ते राष्ट्रांवर आपला यथार्थ निकाल घोषित करतील, मृतदेहांचा ढीग लागेल आणि ते संपूर्ण पृथ्वीच्या शासकांना चिरडून टाकतील. |
| 7 |
| तेव्हा प्रभू वाटेवरील ओहोळातील पाणी पितील, आणि आपले मस्तक उंचावतील. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/110.mp3
150
110