पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| परमेशाचे स्तवन करा!1 सरळ जनांच्या सभेत व मंडळीत मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकारस्मरण करीन. |
| 2 |
| परमेश्वराची कृत्ये थोर आहेत, ज्यांना ती आवडतात ते सर्व त्यांचा शोध करतात. |
| 3 |
| त्याची कृती साक्षात मान व महिमा आहे. त्याचे न्यायीपण सर्वकाळ टिकून राहते. |
| 4 |
| आपल्या अद्भुत कृत्यांचे स्मरण राहावे असे त्याने केले आहे; परमेश्वर दयाळू व कनवाळू आहे. |
| 5 |
| त्याने आपले भय धरणार्यांना अन्न दिले आहे; तो आपला करार सदा स्मरतो. |
| 6 |
| त्याने आपल्या लोकांना राष्ट्रे वतनादाखल देऊन आपल्या कृत्यांचे सामर्थ्य दाखवले आहे. |
| 7 |
| त्याच्या हातची कृत्ये साक्षात सत्य व न्याय आहेत; त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत. |
| 8 |
| ते सदासर्वकाळ अढळ असे आहेत. ते सत्याने व सरळपणाने नेमलेले आहेत. |
| 9 |
| त्याने आपल्या लोकांना उद्धारदान पाठवून दिले आहे; त्याने आपला करार सर्वकाळचा नेमला आहे. त्याचे नाव पवित्र व भययोग्य आहे. |
| 10 |
| परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय. त्याप्रमाणे जे वर्ततात त्या सर्वांना सुबुद्धी प्राप्त होते. त्याचे स्तवन सर्वकाळ चालते. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/111.mp3
150
111