पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| याहवेहचे स्तवन होवो. जिथे नीतिमान एकत्र येऊन सभा आयोजित करतात, तिथे मी संपूर्ण अंतःकरणापासून याहवेहचे स्तवन करेन. |
| 2 |
| याहवेहचे कार्य किती उदात्त आहेत, ते त्या अतिमहान कृत्यांचे मनन करतील. |
| 3 |
| गौरवशाली व वैभवशाली आहेत याहवेहची कृत्ये, आणि त्यांची नीतिमत्ता सर्वकाळ टिकते. |
| 4 |
| याहवेहनी आपल्या या कृत्यांना अविस्मरणीय केले आहे; ते कृपाळू व दयाळू आहेत. |
| 5 |
| जे त्यांचे भय धरतात त्यांना ते अन्नाचा पुरवठा करतात; ते आपला करार नेहमी स्मरणात ठेवतात. |
| 6 |
| त्यांच्या कृत्यांचे सामर्थ्य त्यांच्या लोकांना प्रकट होण्यास, त्यांनी अन्य राष्ट्रांची भूमी त्यांना वतनादाखल दिली. |
| 7 |
| त्यांच्या हाताने केलेली सर्व कृत्ये न्याय्य आणि विश्वसनीय असतात; त्यांचे सर्व नियम विश्वासयोग्य असतात. |
| 8 |
| ते नियम सदासर्वकाळ अटळ आहेत, सत्य आणि सात्विकतेला अनुसरून तयार केलेले आहेत. |
| 9 |
| त्यांनी आपल्या लोकांना मुक्तता दिली आहे; त्यांनी आपला करार अनंतकाळासाठी स्थापित केला आहे— त्यांचे नाव पवित्र व भयावह आहे. |
| 10 |
| याहवेहचे भय सुज्ञानाचा प्रारंभ होय; त्यांच्या नियमाचे पालन करणार्यांना उत्तम आकलन शक्ती प्राप्त होते. याहवेहची सदासर्वकाळ स्तुती होवो. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/111.mp3
150
111