पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| परमेशाचे स्तवन करा!1 जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य! |
| 2 |
| त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल; सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल. |
| 3 |
| धनसंपदा त्याच्या घरी असते; त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ टिकते. |
| 4 |
| सरळ जनांना अंधकारात प्रकाश प्राप्त होतो. त्याच्या ठायी कृपा, दया व न्याय ही आहेत. |
| 5 |
| जो मनुष्य दया करतो व उसने देतो त्याचे कल्याण होते; तो न्यायाने आपले व्यवसाय करील. |
| 6 |
| तो कधीही ढळणार नाही; नीतिमानाचे स्मरण सर्वकाळ राहील. |
| 7 |
| तो वाईट बातमीला भिणार नाही; त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून अढळ राहते. |
| 8 |
| त्याचे मन स्थिर असते, आपल्या शत्रूंची गत आपल्या इच्छेप्रमाणे झालेली पाहीपर्यंत तो भिणार नाही. |
| 9 |
| त्याने सढळ हाताने गरिबांना दान दिले आहे; त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहील. त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल2 |
| 10 |
| हे पाहून दुर्जन खिन्न होईल; तो दातओठ खाईल पण विरघळून जाईल; दुर्जनांची इच्छा नष्ट होईल. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/112.mp3
150
112