मराठी बायबल 2006
|
| 1 |
| परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो त्याची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाचे गुणगान करा. |
| 2 |
| परमेश्वराचे नाव आता आणि सदैव धन्य व्हावे असे मला वाटते. |
| 3 |
| पूर्वेला सूर्य उगवतो तिथपासून ते तो जिथे मावळतो तिथपर्यंत परमेश्वराच्या नावाचे गुणगान व्हावे असे मला वाटते. |
| 4 |
| परमेश्वर सगळ्या देशांपेक्षा उंच आहे. त्याचे तेज आकाशापेक्षा उंच जाते. |
| 5 |
| कुणीही माणूस आमचा देव, जो परमेश्वर आहे त्याच्यासारखा नाही. देव स्वर्गात उंच बसतो. |
| 6 |
| देव आमच्या वर इतका उंच आहे की त्याला आकाश आणि पृथ्वी यांकडे खाली वाकून बघावे लागते. |
| 7 |
| देव गरीब लोकांना घाणीतून वर उचलतो. देव भिकाऱ्यांना कचऱ्याच्या ढिगातून काढतो. |
| 8 |
| आणि देव त्या लोकांना महत्व देतो. देव त्या लोकांना महत्वाचे नेते बनवतो. |
| 9 |
| स्त्रीला मूळ होत नसेल तर देव तिला मुले देईल आणि तिला आनंदी करेल. परमेश्वराची स्तुती करा. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi/psalms/113.mp3
150
113